Last Updated: Sunday, October 13, 2013, 19:28
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई पॅरोलवर सुटून तुरुंगाबाहेर आलेल्या संजय दत्तला आणखी मोठा दिलासा मिळालाय. संजयला आणखी १४ दिवसांची मुदतवाढ मंजूर करण्यात आलीय.
बेकायदेशीर पद्धतीनं शस्त्र बाळगल्याप्रकरणी सध्या पुण्याच्या जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या संजय दत्तला नुकतीच १४ दिवसांची पॅरोलची रजा मंजूर करण्यात आली होती. १ ऑक्टोबर रोजी संजय दत्त तुरुंगातून घरी परतला होता. त्यानंतर पुन्हा पोलिसांसमोर हजर होण्याची मुदत संपण्याआधीच संजय दत्तला आणखीन १४ दिवसांची मुदतवाढ मिळालीय.
कोर्टानं पाच वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर २२ मे रोजी संजय दत्तनं टाडा कोर्टासमोर आत्मसमर्पण केलं होतं. यामधील १८ महिन्यांची शिक्षा संजयनं सुनावणीआधीच भोगलीय. त्यामुळे उरलेली साडे तीन वर्षांची शिक्षा भोगण्यासाठी त्यानं आत्मसमर्पण केलं. त्यानंतर त्याला मुंबईतून पुण्याच्या येरवडा कारागृहात हलवण्यात आलं होतं. त्यानंतर पहिल्यांदाच त्याला ही पॅरोल रजा मंजूर करण्यात आली होती.
यानंतर, तब्येतीचं कारण पुढे करून संजय दत्तला फर्लोची सुट्टी मिळाली होती. आता पुन्हा एकदा तब्येतीचं कारण पुढे करत संजयनं मुदतवाढ मिळवलीय. त्यामुळे संजयला तब्बल २८ दिवसानंतर पुन्हा तुरुंगात परतावं लागेल.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, October 13, 2013, 19:28