अच्छे दिन... पाक करणार 152 मच्छिमारांची सुटका

Last Updated: Sunday, May 25, 2014, 10:37

नरेंद्र मोदींच्या शपथविधीच्या दिवशी म्हणजेच 26 मे रोजी 152 भारतीय मासेमारांची सुटका करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारनं घेतलाय.

संजूबाबाची पॅरोल रजा संपली

Last Updated: Friday, March 21, 2014, 10:10

पत्नी मान्यताच्या उपचारांसाठी तुरूंगाबाहेरवर असलेल्या संजय दत्तच्या पॅरोलची मुदत आज संपत आहे. पत्नी मान्यताच्या आजारासाठी संजय दत्त २१ डिसेंबरपासून पॅरोलवर आहे.

९० रुपयांच्या चोरीची भोगली १३ वर्ष शिक्षा!

Last Updated: Monday, January 20, 2014, 14:58

९० रुपयांची चोरी केल्याच्या आरोपानंतर तब्बल १३ वर्षांपासून तुरुंगात असलेल्या एकाला हायकोर्टानं आज सोडलं. कदाचित चोरीप्रकरणी एका निर्दोष व्यक्तीला अटक केल्याचीही दिल्ली हायकोर्टानं व्यक्त केली.

हुडहुडी.....फरार कैदी गारठल्याने तुरुंगात शरण!

Last Updated: Thursday, January 9, 2014, 18:23

अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून थंडीने जोर पकडला आहे. महासत्तेलाही नमोहरम करणाऱ्या या थंडीचे जसे तोटे आहे तसा फायदाही झाला आहे. या महाभयंकर थंडीमुळे अमेरिकेतील कारागृहातून फरार झालेला कैदी रक्त गोठविणाऱ्या थंडीने हैराण झाल्यामुळे चक्क पोलिसांना फोन करून शरण आला आहे.

टोगोच्या तुरुंगातून कॅप्टन सुनील जेम्सची सुटका, आज भारतात परतणार

Last Updated: Thursday, December 19, 2013, 09:24

मागील सहा महिन्यांपासून टोगो इथल्या तुरुंगात बंद असलेले कॅप्टन जेम्स तुरुंगातून सुटलेले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी याबाबत ट्वीट करुन ही महिती दिलीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टोगोच्या तुरुंगातून सुटल्यानंतर जेम्स आज रात्रीपर्यंत भारतात परततील.

तुरुंगातून निवडणूक लढविण्‍यास न्‍यायालयाची मंजुरी

Last Updated: Wednesday, November 20, 2013, 08:49

तुरुंगात असलेल्‍या नेत्‍यांना सर्वोच्‍च न्‍यायालयाने एक दिलासा दिला आहे. तुरुंगातून निवडणूक लढविण्‍यास न्‍यायालयाने मंजुरी दिली आहे. लोकसभेत संमत करण्‍यात आलेल्‍या दुरुस्‍ती विधेयकाला न्‍यायालयाने मंजुरी दिली आहे.

दोन महिन्यांनंतर आसाराम बापूवर चार्जशीट दाखल!

Last Updated: Wednesday, November 6, 2013, 15:06

अल्पवयीन मुलींवरील बलात्कार केल्या प्रकरणी आसाराम बापूंवर आज जोधपूरच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय.

चारा खाणाऱ्या ‘माळ्या’ला मिळणार १४ रुपये रोज!

Last Updated: Tuesday, November 5, 2013, 14:28

चारा खाऊन थकलेल्या बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांना रांचीतील बिरसा मुंडा तुरुंगात बागकाम करण्याची संधी मिळालीय.

नागपुरात पुन्हा सापडले कैद्यांजवळ मोबाईल्स

Last Updated: Thursday, October 17, 2013, 19:15

तुरुंग सुरक्षेचे सर्व कायदे धाब्यावर बसवत नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांजवळ मोबाइल फोन सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय.

पॅरोल रजेतही संजय दत्तला मुदतवाढ...

Last Updated: Sunday, October 13, 2013, 19:28

पॅरोलवर सुटून तुरुंगाबाहेर आलेल्या संजय दत्तला आणखी मोठा दिलासा मिळालाय. संजयला आणखी १४ दिवसांची मुदतवाढ मंजूर करण्यात आलीय.

लालूंना जोरदार झटका, पाच वर्षांचा तुरुंगवास!

Last Updated: Thursday, October 3, 2013, 15:08

सीबीआयच्या विशेष न्यायालयानं चारा घोटाळ्या प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांचा तुरुंगवास सुनावलाय. सोबतच त्यांना २५ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय.

संजय दत्त बाहेर... १४ दिवसांच्या `पॅरोल`वर!

Last Updated: Tuesday, October 1, 2013, 12:52

येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेला बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याची आज ‘पॅरोल’वर सुटका करण्यात आलीय. १४ दिवसांची संचित रजा त्याला मंजूर करण्यात आलीय.

१६ महिन्यानंतर जगन मोहन रेड्डी तुरुंगाबाहेर!

Last Updated: Tuesday, September 24, 2013, 11:47

दिवंगत मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांचे पुत्र आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांना अखेर जामीन मिळालाय. बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी त्यांची सीबीआय चौकशी असून गेल्या १६ महिन्यांपासून ते आंध्र प्रदेशातल्या चंचलगुडा तुरूंगात होते.

आसाराम बापूंची आजची रात्र तुरुंगातच!

Last Updated: Sunday, September 1, 2013, 19:00

अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी आसाराम बापूंना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.. जोधपूरच्या कोर्टाने ही कोठडी सुनावलीय. त्यामुळे आसाराम बापूंना रविवारची रात्र जेलमध्ये काढावी लागणार आहे.

`सनाउल्लाह`ची हत्या करणाऱ्याचा गौरव!

Last Updated: Wednesday, June 12, 2013, 13:02

जम्मू जेलमध्ये बंदिस्त असलेल्या पाकिस्तानी कैदी सनाउल्लाह याची हत्या करणाऱ्या भारतीय कैद्याला बक्षीस जाहीर केलं गेलंय. उत्तर प्रदेशमधल्या ‘शिवसेना हिंदुस्तान’ पक्षानं त्याला एक लाख रुपये देऊन त्याचा एकप्रकारे गौरवच केलाय.

हनीमूनला नाही पुन्हा तरुंगात गेला अंकीत!

Last Updated: Thursday, June 6, 2013, 14:28

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील आरोपी क्रिकेटर अंकित चव्हाण पुन्हा एकदा तुरुंगात जाण्यासाठी गुरुवारी पहाटेच दिल्लीला रवाना झाला.

संजयचा ‘सरेंडर प्लान’

Last Updated: Thursday, May 16, 2013, 09:42

शरणागतीसाठी संजूबाबाचा सरेंडर प्लान तयार आहे. मुंबईच्या पाली हिल इथल्या त्याच्या घरापासून येरवडा जेलपर्यंतचा प्लान कसा असेल… पाहुयात...

...अशी असेल संजयची तुरुंगातील लाईफस्टाईल!

Last Updated: Thursday, May 16, 2013, 09:29

संजय कोणत्या कारागृहात जाणार याचाही फैसला आज टाडा कोर्ट घेणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येरवडा जेलमध्ये संजय दत्तला हलवण्याची तयारी सुरू आहे. संजयला तुरुंगातील बिल्लाही मिळालाय.

हॅलिकॉप्टरला लटकले अन् कैदी सटकले!

Last Updated: Tuesday, March 19, 2013, 13:22

कॅनडाच्या क्युबेकस्थित तुरुंग दुसऱ्या क्रमांकाचं तुरुंग म्हणून ओळखलं जातं. पण, याच तुरुंगातून दोन कैद्यांनी हॅलिकॉप्टरच्या साहाय्यानं पळ काढला आणि तुरुंग अधिकारी मात्र पाहतच राहिले. ही फिल्मी कहानी नुकतीच प्रत्यक्षात घडलीय.

प्रवीण तोगडियांवर गुन्हा दाखल; तुरुंगात जाणार?

Last Updated: Friday, February 8, 2013, 10:17

प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया चांगलेच अडचणीत आलेत. नांदेड जिल्ह्यातल्या भोकरमध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांना अटक होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येतेय.

तुरुंगात 'बिस्किटं' भाजणार अजय चौटाला...

Last Updated: Saturday, January 26, 2013, 12:55

हरियाणातील `शिक्षक भरती घोटाला` प्रकरणात दहा वर्षांच्या कारावसाची शिक्षा ठोठावण्यात आलेला आमदार अजय चौटाला याला तुरुंगात बिस्किटे बनविण्याच्या बेकरीत काम देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.

सर्व भारतीय मच्छिमारांना करणार मुक्त; पाकचा निर्णय

Last Updated: Wednesday, January 23, 2013, 07:25

पाकिस्तानची सद्भाभना जागी झालीय. पाकिस्तानी तुरुंगात गेल्या कित्येक वर्षांपासून खितपत पडलेल्या सर्व भारतीय मच्छिमारांना सोडून देण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारनं घेतलाय.

ओवैसी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत

Last Updated: Wednesday, January 9, 2013, 15:09

भडकाऊ भाषण देण्याच्या आरोपावरून मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम)चे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांना बुधवारी आदिलाबाद जिल्ह्यातील निर्मलनगरमध्ये मॅजिस्टेटसमोर हजर करण्यात आलं. यावेळी त्यांना १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आलीय.

शॉर्ट स्कर्ट घालाल तर तुरूंगात जाल!

Last Updated: Tuesday, December 25, 2012, 18:43

महिलांनी जर मिनी स्कर्ट घातला, तर त्यांना अटक करण्यात येईल असा इशारा स्वाझीलंड सरकारने दिला आहे. मिनी स्कर्टमुले महिलांच्या मांड्या आणि पोटाचा भाग दिसत असतो. त्यामुळे असा पोषाख उत्तेजित करणारा ठरतो.

मुलाला धमकीः नॉर्वेतल्या भारतीय पालकांना तुरुंगवास

Last Updated: Tuesday, December 4, 2012, 17:05

वागणूक सुधारली नाही तर भारतात परत पाठवण्याची धमकी आपल्या मुलाला देणाऱ्या भारतीय दांपत्यास नॉर्वे येथील कोर्टाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. मुलाच्या वडिलांना १८ महिन्यांची तर आईला १५ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

भारतीय वंशाचे उद्योजक रजत गुप्ता यांना तुरुंगवास

Last Updated: Thursday, October 25, 2012, 13:23

इनसाईडर ट्रेडिंग प्रकरणी दोषी आढळलेले भारतीय वंशाचे अमेरिकन उद्योजक रजत गुप्ता यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसंच त्यांना ५० लाख डॉलर्सचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

तुरुंग महानिरीक्षक पवार निलंबित

Last Updated: Monday, June 18, 2012, 11:51

येरवडा जेलमध्ये कातिल सिद्दीकी या संशयित अतिरेक्याच्या हत्याप्रकरणी तुरुंग महानिरीक्षक प्रकाश पवार यांच्यासह चारजण निलंबित करण्यात आलेत. निलंबित इतर कर्मचा-यांमध्ये तुरुंग अधिकारी चंद्रकिरण तायडे आणि एस. जाधव आणि आर. अवघडे यांचा समावेश आहे.

मी देशद्रोही.. तर तुरुंगात टाका - अण्णा

Last Updated: Tuesday, June 12, 2012, 22:19

टीम अण्णाच्या आंदोलनामागे परदेशी शक्ती असल्याच्या पंतप्रधान कार्यालयाच्या आरोपाला आज अण्णांनी उत्तर दिलय. आंदोलनामागे परदेशी शक्ती असतील, तर त्याचे पुरावे द्या, असा पलटवार अण्णांनी केलाय. आपण जर देशद्रोही आहे, असं सरकारला वाटतं असेल, तर सरकारने तुरुंगात टाकावे असं आव्हान अण्णांनी दिले आहे.

कैद्यांची तुरुंगातील बडदास्त !

Last Updated: Monday, June 4, 2012, 22:32

..धनदांडग्यांसाठी कायदा वाकवला जात असल्याचं या प्रकरणातून उघड झालंय..ऍलिस्टर परेराची नाशिकच्या तुरुंगात कशा प्रकारे शाही बडदास्त ठेवली जातेय ?...कोण पुरवतं कैद्यांना या सुविधा ? भ्रष्ट यंत्रणा याला कारणीभूत तर नाही ना ? या आणि अशा विविध पैलूंचा वेध घेतला आहे, प्राईम वॉचमध्ये ....तुरुंगातील बडदास्त !

परेराला तुरुंगात शाही वागणूक; चौकशी सुरू

Last Updated: Sunday, June 3, 2012, 15:50

‘हिट एन्ड रन’ प्रकरणात नाशिक जेलमध्ये शिक्षा भोगणाऱ्या एलिस्टर परेरा या गुन्हेगाराला तुरुंगातच शाही वागणूक मिळत असल्याचं वृत्त ‘झी 24 तास’नं प्रसारीत केल्यानंतर तुरुंग प्रशासन खडबडून जागं झालयं. एलिस्टर परेराच्या शाही वागणुकीची डीआयजी स्तरावर चौकशी सुरु झालीये.