Last Updated: Friday, December 14, 2012, 18:06
www.24taas.com, मुंबईभारतीय मुळाची कॅनडा फिल्म अभिनेत्री सनी लिऑनला भारतात इंटरनेटवर सर्वाधिक सर्च झाल्याबद्दल स्वतःबद्दल गर्व वाटतो आहे. गुगलने या वर्षाच्या सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली. यात सनी लिऑन हिला पहिले स्थान तर भारतीय सिनेमाचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांना अधिक सर्च मिळाल्याचे नमूद करण्यात आले.
हा माझ्या जीवनातील सर्वात गर्वाचा क्षण आहे. मी आणि माझे पती डॅनिअल वेबर स्वतःची ओळख बनविण्यासाठी बरची मेहनत करतो. हा वास्तविक खूप मोठा सन्मान आहे. लोक आणि माझे प्रशंसक मला इंटरनेटवर शोधतात. मी स्वतःला भाग्यशाली समजते.
सनी लिऑनने ‘जिस्म २’ द्वारे आपल्या बॉलिवुड करिअरला सुरूवात केली. तिचा आगामी चित्रपट रागिनी एमएमएस २ ची प्रेक्षक वाट पाहत आहेत.
First Published: Friday, December 14, 2012, 18:00