Last Updated: Sunday, June 23, 2013, 19:17
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईपॉर्नस्टार सनी लिऑनने ‘जिस्म २’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अभनयाचं अंग नसूनही तिला नवनवे सिनेमे मिळत आहेत. आता कैझाद गुस्तादच्या आगामी सिनेमात सनी लिऑनसोबत तिचा नवरा डॅनियल वेबरही झळकणार आहे.
सध्या सनी लिऑन ‘रागिणी एमएमएस २’ या सिनेमाचं शुटिंग करत आहे. या आधीच एका मुलाखतीत तिने आपल्या नवऱ्याच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दल कल्पना दिली होती. यापूर्वी ‘बॉम्बे बॉइज’, ‘बूम’ यांसारखे बोल्ड सिनेमे देणारा दिग्ददर्शक कैझाद गुस्ताद हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहे.
मात्र या सिनेमात डॅनियल सनीचा हिरो नसेल. सध्या सनी आणि डॅनियल गोव्यामध्ये याच फिल्मचं शुटिंग करत असल्याचंही सांगितलं जात आहे. यापूर्वी सनी लिऑनसोबत त्याने काही पॉर्न सिनेमांमध्ये काम केलं होतं.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, June 23, 2013, 19:17