`लैला तेरी ले लेगी` गाण्यात सनी लिऑनचा देशी तडका Sunny leone`s `Laila`

`लैला तेरी ले लेगी` गाण्यात सनी लिऑनचा देशी तडका

`लैला तेरी ले लेगी` गाण्यात सनी लिऑनचा देशी तडका
www.24taas.com, मुंबई

पॉर्न स्टार सनी लिऑनचा बॉलिवूडमधला पहिला वहिला सिनेमा अपेक्षाभंग करणारा ठरला. जिस्म-२ पाहिल्यावर सनी लिऑनला अभिनय जमतच नाही, हे प्रेक्षकांच्या लक्षात आलं. मात्र सनी लिऑन आगामी शूटआऊट अॅट वडाला या सिनेमात आयटम साँगवर थिरकणार आहे.

अभिनयाचं अंग नसतानाही अंगप्रदर्शनाच्या जोरावर सनी लिऑन बॉलिवूडमध्ये चमकली. तिला भारतात येताच अनेक सिनेमांच्या ऑफर आल्या. आता संजय गुप्ताच्या शूटआऊट ऍट वडाला या सिनेमात सनी लिऑन लैला तेरी ले लेगी या आयटम साँगवर सनी लिऑन देशी डान्स मुव्ह्ज करणार आहे. या गाण्यात तिच्यासोबत जॉन आब्रहम आणि तुषार कपूर नाचताना दिसतील. या सिनेमात जॉन अब्रहम मन्या सुर्वेची भूमिका साकारत आहे.


सनी लिऑनने या गाण्यात देशी तडका लगावला आहे. सनी लिऑन या गाण्यात असल्यामुळे हे गाणं किती बोल्ड असेल, याचा अंदाज आपल्याला येईलच. या शिवाय या सिनेमात अनिल कपूरही दिसणार आहे.

First Published: Thursday, April 4, 2013, 15:58


comments powered by Disqus