Last Updated: Wednesday, April 10, 2013, 17:18
www.24taas.com, मुंबईकॅनडियन पॉर्न स्टार सनी लिऑनचं देशी ठुमक्यांचं ‘लैला तेरी ले लेगी…’ हे गाणं टीव्हीवर दाखवण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र इंटरनेटवर या व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे.
या गाण्यातील डान्स आणि शब्द अश्लिल असल्यामुळे सेंसॉर बोर्डाने हे गाणं टीव्हीवर दाखवण्यास बंदी घातली आहे. शूटआऊट ऍट वडाला या सिनेमातील लैला तेरी ले लेगी या गाण्याचे शब्द अश्लील असल्याचे सांगत ‘लैला तेरी लूट लेगी’ असे शब्द बदलण्यात आले आहेत. शब्द बदलून हे गाणं टीव्हीवर दाखवण्यास परवानगी मिळणार आङे. त्यामुळे या गाण्याचे शब्द बदलून पुन्हा हे गाणं रेकॉर्ड केलं गेलं.
सनी लिऑनने या गाण्यात ‘लैला’ बनून ठुमके लगावले आहेत. या गाण्यात तिच्यासोबत जॉन आब्रहम आणि तुषार कपूर आहेत. सनी लिऑनच्या अदांनी युट्युबवरच्या प्रेक्षकांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे.
First Published: Wednesday, April 10, 2013, 17:18