जिया खान आत्महत्या : सुरजला जामीन मंजूर!, suraj pancholi grant bail by high court

जिया खान आत्महत्या : सुरजला जामीन मंजूर!

जिया खान आत्महत्या : सुरजला जामीन मंजूर!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणातील आरोपी सुरज पांचोली याला अखेर जामीन मंजूर करण्यात आलाय.

जिया खान हिच्या आत्महत्येस जबाबदार असल्याच्या आरोपावरून सुरज पांचोली याला अटक करण्यात आली होती. सुरज हा अभिनेता आदित्य पांचोली याचा मुलगा आहे. हायकोर्टानं ५० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुरजला जामीन मंजूर केलाय.

अभिनेत्री जिया खान हिच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी जिया खानचा बॉयफ्रेंड सुरज पांचोली याला १० जून रोजी अटक केली होती. जिया खानच्या आत्महत्येनंतर सापडलेल्या सहा पानी पत्रामध्ये जिया खान आणि सुरज पांचोलीच्या नात्यामधील काही रहस्यमय गोष्टी उघडकीस आल्या होत्या.

अभिनेत्री जिया खान आणि सूरज पांचोली यांचे प्रेमसंबंध होते. या प्रेमात आकंठ बुडालेले हे दोघे गेल्या वर्षभरापासून ‘लिव्ह इन संबंध’ ठेवून होते, असं पोलीस तपासात उघड झालं होतं. जियाच्या आत्महत्येनंतर तब्बल तीन दिवसांनी सापडलेल्या पत्रात सूरज जियाला मारहाण करायचा तसंच धमकवायचा असा उल्लेख आढळला होता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, July 1, 2013, 14:13


comments powered by Disqus