मी वसीमशी लग्न करत नाही- सुश्मिता सेन Sushmita sen rubbishes rumour of wedding with Wasim akram

मी वसीमशी लग्न करत नाही- सुश्मिता सेन

मी वसीमशी लग्न करत नाही- सुश्मिता सेन
www.24taas.com, मुंबई

वसीम अक्रमशी लग्न करणार नसल्याचं अभिनेत्री सुश्मिता सेनने स्पष्ट केलं आहे. वसीम हा माझा चांगला मित्र आहे, असं सुश्मिता सेनने म्हटलं आहे. काही वर्षांपूर्वी एका रिऍलिटी शोचं परीक्षण करताना दोघांमध्ये अफेअर असल्याचं म्हटलं जात होतं.

अभिनेत्री सुश्मिता सेन आणि माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू वसीम अक्रम लवकरच लग्न करणार अशी चर्चा सध्या बीटाऊनमध्ये चांगलीच रंगत होती. मात्र या चर्चा म्हणजे अफवा असल्याचं खुद्द सुश्मिता सेनने जाहीर केलंय तेही सोशल नेटवर्किंग साइटवरून. ट्विटरवर सुश्मिताने आपण वसीमशी लग्न करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

वसीम हा माझा चांगला मित्र असल्याचंही तीने स्पष्ट केलंय. असो वसीम नाही तर नाही मात्र सुश्मिता तू लवकरच लग्न करावं अशी तुझ्या चाहत्यांची नक्कीच इच्छा आहे.

First Published: Monday, April 15, 2013, 20:54


comments powered by Disqus