Last Updated: Saturday, December 28, 2013, 15:54
www.24taas.com, मुंबईअभिनेता ऋतिक रोशन आणि सुजान खान यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांचा काडीमोड झाला. आता सुजानने ऋतिककडे पोटगी पोटी १०० कोटी रूपये मागितले आहेत. याबाबत ऋतिकडून दुजोरा मिळालेला नाही.
१७ वर्षांच्या प्रेम संबंधांनंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. ऋतिक आणि सुजान घटफोस्ट घेणार असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये दबक्या आवाजात सुरू होती. मात्र, ऋतिकने ट्विट केल्यानंतर त्याला अधिकृत दुजोरा मिळाला. १३ वर्षांच्या वैवाहीक जबाबदारीतून दोघेही मोकळे झालेत. १३ डिसेंबर २०१३ ला दोघे वेगळे झालेत. त्याआधी सुजान माहेरी राहत होती.
मी मागितलेली १०० कोटी रूपये रक्कम जास्त नाही. १०० कोटी रूपये म्हणजे प्रचंड रक्कम नाही, असे मला वाटते. ही रक्कम मी माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी आणि त्याच्या संगोपनासाठी खर्च करणार असल्याचे सुजानचे म्हणणे आहे. ऋतिककडे सुजानने पोटगी मागितल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आलेय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, December 28, 2013, 15:54