Last Updated: Monday, May 5, 2014, 19:45
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईसुझान खानने अभिनेता ऋतिक रोशन सोबत घटस्फोटाचा अर्ज दाखल केलाय. मात्र घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्याच्या दुसऱ्याच दिवशी सुझान अर्जुन रामपालसह एका पार्टीत दिसून आली.
सुझान आणि तिचा मित्र अर्जुन रामपाल मुंबईतील एका क्लबमध्ये पार्टीत दंग होतांना दिसून आले. सुझान यावेळी खुपच खूश असल्याचं दिसून आली. ऋतिक रोशनपासून सुझाव दूर जाण्याचं कारण अर्जुन रामपाल असल्याची चर्चा आहे.
या पार्टीत फक्त सुझान आणि अर्जुन रामपाल होता असं नाही, तर डिनो मोरया, दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि विकी रतनानी हे उपस्थित होते.
ऋतिक आणि सुझान या दोघांना दोन मुलंही आहेत. ते मागील १७ वर्षांपासून एकत्र होते, आता वेगळे झाल्यापासून मुलं सुझानसह वर्सोवामध्ये राहतात. मुलांचा ताबा सुझानकडे असणार आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, May 5, 2014, 19:45