तीन लाखांत दाखल व्हा शाहरुखच्या घरात!, take shahrukh khan first flat in mumbai on rent

तीन लाखांत दाखल व्हा शाहरुखच्या घरात!

तीन लाखांत दाखल व्हा शाहरुखच्या घरात!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या घरात राहायला मिळालं तर... शाहरुखच्या चाहत्यांसाठी ही तर पर्वणीच ठरेल. पण, तुम्हाला सांगायलाच हवं की शाहरुखच्या घरात म्हणजे तो सध्या राहत असलेल्या ‘मन्नत’ या बंगल्यात नव्हे तर त्यानं मुंबईमध्ये सर्वात पहिलं विकत घेतलेल्या एका घरात भाड्यानं राहण्याची संधी तुम्हाला मिळू शकते.

कार्टर रोडच्या अमृत अपार्टमेंटमध्ये सातव्या मजल्यावर शाहरुखचं हा मुंबईतला पहिला फ्लॅट आहे. तीन बेडरुम, लिव्हिंग रुम आणि मॉड्युलर किचन असा भला मोठा आवाका असलेलं हे घर आपल्यासाठी खूप लकी असल्याचं शाहरुख मानतो. त्यामुळेच या घराचं त्याच्यासाठी भावनिक महत्त्व जास्त आहे. शाहरुखच्या या घरात तुम्हाला त्याच्या कोणत्याही वस्तू सापडणार नाहीत कारण हा फ्लॅट पूर्णत: अनफर्निश्ड आहे. परंतु, एअरकंडिशनची सोय मात्र घरात आहे.

‘दीवाना’च्या रिलीजनंतर शाहरुख या घरात राहायला आला होता. तेव्हा त्याच्याकडे लाल रंगाची पजेरो कार असायची. शाहरुखच्या मुलाचा जन्मही याच घरात झाला होता. त्यामुळे हे लकी घर विकण्याची शाहरुखची इच्छा नाही. मन्नतमध्ये राहायला जाण्याआधी तो याच घरात राहत होता’ असं इथल्या शाहरुखच्या जुन्या शेजाऱ्यांनी सांगितलं.

या भागात आणि सोसायटीत दीड लाखांपर्यंत फ्लॅट भाड्यानं मिळू शकतात. पण, शाहरुखच्या घराला अर्थातच मागणी जास्त.... त्यामुळे त्यासाठी किंमतही जास्त... पण ही किंमत मोजायला अनेक जण एका पायावर तयार आहेत. ब्रोकरच्या माहितीनुसार समुद्रकिनाऱ्यानजिक सातव्या मजल्यवरच्या या फ्लॅटसाठी १५ लाख रुपये सिक्युरिटी डिपॉजिटही भरावं लागणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, August 8, 2013, 20:01


comments powered by Disqus