‘तलाश’ची पहिली कमाई १५ करोड!, `Talaash` expected to earn Rs.15 crore on opening day

‘तलाश’ची पहिली कमाई १५ करोड!

‘तलाश’ची पहिली कमाई १५ करोड!
www.24taas.com, मुंबई

आमिर खानचा तलाश शुक्रवारी रिलीज झाला आणि पहिल्याच दिवशी या सिनेमानं अनेकांना आकर्षित केल्याचं जाणवलं. या सिनेमानं पहिल्याच दिवशी कमाई केलाय.

या आठवड्यात कोणतीही सुट्टी नसून ‘तलाश’च्या कमाईच्या आकड्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. आत्तापर्यंत राज १०,५० करोड, बोल बच्चन ११.७५ करोड, कॉकटेल १०.७५ करोड, राजनीती १०.५० करोड तर बर्फीनं ८.५ करोड रुपये इतकी पहिल्या दिवसाची नोंद केली होती. या सर्वांना मागे टाकत तलाशनं आपलं नाणं ठसठशीत असल्याचं दाखवून दिलंय.

रिमा कागती दिग्दर्शित तलाश हा एक थ्रिलर सिनेमा आहे आणि हीच या सिनेमाची जमेची बाजू असल्याचं म्हटलं जातंय. तलाशच्या सगळ्या टीमनं सिनेमा पाहून आलेल्या प्रेक्षकांना आणि समीक्षकांना चित्रपटातील सिक्रेट न फोडण्याची विनंती केलीय. लोकांनाही वाटतंय, की आमिर खानचा सिनेमा आहे तर तो खास असणारचं! त्याचाच हा परिणाम बॉक्स ऑफिसवरही दिसून आलाय.

First Published: Saturday, December 1, 2012, 13:06


comments powered by Disqus