‘पा’फेम तरुणी सचदेवचा विमान दुर्घटनेत बळी - Marathi News 24taas.com

‘पा’फेम तरुणी सचदेवचा विमान दुर्घटनेत बळी

www.24taas.com, काठमांडू
 
 
सोमवारी नेपाळमध्ये झालेल्या विमान अपघातात १४ वर्षांच्या तरुणी सचदेवचाही बळी गेलाय. या अमिताभच्या ‘पा’ सिनेमातील छोट्या अमिताभच्या छोट्या मैत्रिणीचा चेहरा आजही सर्वांच्या लक्षात आहे.
 
वयाच्या सहाव्या वर्षापासून वेगवेगळ्या उत्पादनांच्या जवळजवळ ५० जाहिरातींमध्ये तरुणी सचदेव झळकली होती. त्यातील एका जाहिरातीत ती करिष्मा कपूरसोबतही दिसली होती. अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्येही तरुणीनं आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. तरुणी सचदेव नेपाळच्या एका प्रसिद्ध मंदिरात दर्शनासाठी जात होती. या क्रूर अपघातानं तिच्या आईचाही बळी घेतलाय.
 
अग्नी एअरलाईन्सच्या या विमानात २१ प्रवासी होते. त्यापैकी १६ प्रवासी भारतीय होते. काल उत्तर नेपाळमधील डोंगराळ भागात एका कड्यावर आदळून या विमानाला अपघात झाला होता.
 
 

First Published: Tuesday, May 15, 2012, 11:48


comments powered by Disqus