'अजिंठा'चा शो पाडला बंद - Marathi News 24taas.com

'अजिंठा'चा शो पाडला बंद

 www.24taas.com, नवी मुंबई
‘अजिंठा’ सिनेमाचा वाद अजून क्षमण्याचं काही नाव घेत नाही. आज वाशीच्या रघुवीर मॉलमधील फेम थिएटरमध्ये सिनेमा सुरु असताना एका प्रेक्षकानेच स्क्रीन फाडली. त्यामुळे इथं ताबडतोब शो बंद करण्यात आला.
 
यापूर्वी नितीन चंद्रकांत देसाई यांच्या या चित्रपटाला बंजारा समाजाने विरोध केला होता. सेन्सॉर बोर्डाच्या समितीतील सदस्य संजीवकुमार राठोड यांनीदेखील चित्रपटातील काही दृश्‍यांना हरकत घेतली होती.  त्यानंतर ‘अजिंठा’चे निर्माते देसाई यांनी पुनर्परिक्षण समितीकडे धाव घेतली होती. समितीने हा चित्रपट पाहून त्याला हिरवा कंदील दाखविला होता.  मुंबई उच्च न्यायालयानंही चित्रपटाच्या प्रदर्शनाला हरकत घेतली नव्हती. रविवार १३ जूनपासून हा चित्रपट ठिकठिकाणी पडद्यावर झळकतोय.

First Published: Tuesday, May 15, 2012, 13:59


comments powered by Disqus