Last Updated: Friday, May 25, 2012, 14:39
www.24taas.com, बंगळुरू पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकने ‘द डर्टी पिक्चर’ सिनेमाच्या कन्नड रिमेकमचं शूटिंग सुरू केलं आहे. आपल्याला मिळालेल्या भूमिकेबद्दल वीणा प्रचंड खूश आहे. या सिनेमातून तिला ग्लॅमरल रोल साकारायला मिळत आहे आणि त्याचबरोबर आपलं टॅलेंट दाखवायचीही संधी आपल्याला मिळत आहे, असं वीणाने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.
कन्नड 'डर्टी पिक्चर'चं दिग्दर्शन त्रिशूल करत असून वेंकटप्पा या सिनेमाचे निर्माते आहेत. वेंकटप्पा यांचाच मुलगा अक्षय या सिनेमात मुख्य भूमिका साकारत आहे. या सिनेमाचं कथानक आकून वीणाने ताबतोब हा सिनेमा करण्यास होकार दिला. या सिनेमातून आपल्याला आपली अभिनयक्षमता दाखवता येईल, असा वीणाला विश्वास वाटतोय. अंगप्रदर्शन आणि भावनिक नाट्य याशिवाय इतरही बरेच पैलू या सिनेमात असल्याचं वीणाचं म्हणणं आहे. वीणाचा व्हिसा संबंधित गोंधळ आता दूर झाला असल्यामुळ, तिच्या तारखांचा आता शूटिंगसाठी काहीही प्रॉब्लेम होणार नाही, असा विश्वास निर्माते वेंकटप्पा यांना वाटतोय. का
मूळ द डर्टी पिक्चर हा हिंदी सिनेमा असून विद्या बालनने यात दक्षिणेतील सिल्क स्मिता या अभिनेत्रीच्या जीवनाशी संबंधित भूमिका साकारली होती. यासाठी विद्याला राष्ट्रीय पारितोषिकही मिळालं होतं. आता तशीच भूमिका वीणा मलिकला साकारयला मिळणार असल्याने वीणा प्रचंड एक्साइट झाली आहे.
First Published: Friday, May 25, 2012, 14:39