रजनीकांत दिसणार 'कोलावरी डी'मध्ये - Marathi News 24taas.com

रजनीकांत दिसणार 'कोलावरी डी'मध्ये

झी २४ तास वेब टीम, चेन्नई
 
सध्या सोशल नेटवर्किंग साईटवर, ग्लोबल म्युझिकच्या टॉप लिस्टवर, कॉलर ट्यूनवर...इतकंच कशाला तर यंगिस्तानच्या तोंडी गाजतंय ते 'कोलावरी डी' हे साँग. आत्तापर्यंत या गाण्याने म्युझिक चार्टबस्टरवर नवा उच्चांक गाठलाय. आणि आता हेच गाणं आणखी एक नवा रेकॉर्ड करण्यासाठी सज्ज झालंय. कारण या गाण्याच्या व्हिडिओमध्ये सुपरस्टार  रजनीकांत झळकणार असल्याची चर्चा आहे. साक्षात् रजनीकांत या गाण्यात आपल्या करामती दाखवताना दिसणार असल्यामुळे हे गाणं नवा रेकॉर्ड करेल अशीच चर्चा बॉलिवूडपासून टॉलिवूडपर्यंत होतेय.
 
विशेष म्हणजे रजनीकांतचा जावई धनुषने हे गाणं स्वत: गायलंय. आणि तेही रजनीकांतच्या मुलीच्या अर्थात धनुषच्या पत्नीच्या सिनेमातच. रजनीकांतची मुलगी असणाऱ्य़ा ऐश्वर्याच्या आगामी 'थ्री ' या सिनेमातलं हे गाणं असल्यामुळे आपल्या मुलीचा सिनेमा हिट करण्यासाठी रनजीकांत प्रयत्नांची पराकाष्ट करणारच. आणि रजनीकांत यांची लोकप्रियता, त्यांच्या फॅन्सची यादी, आणि सुपरहिट सिनेमांचं कलेक्शन पाहता  हे गाणंदेखील नवा करिष्मा करेल असंच दिसतंय. तेव्हा या गाण्यात रजनीकांत यांची जादू पाहण्यासाठी सज्ज व्हा.

First Published: Saturday, December 3, 2011, 12:19


comments powered by Disqus