'कोलावेरी डी' गाणं हिंसक!

Last Updated: Thursday, April 5, 2012, 12:44

'3' सिनेमातील कोलावेरी डी गाण्याने देशभरात धुमाकुळ घातला, ते गाणं मानसिक हिंसा घडवणारं आहे, असं म्हटलं तर तुम्हाला खरं वाटेल का? पण, असं आहे खरं. केरळ हाय कोर्टात कोलावेरी डी गाण्याविरोधात चक्क जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

कोलावेरी डी स्टार धनुष-ऐशवर्या संबंधांमध्ये कटुता

Last Updated: Tuesday, April 3, 2012, 13:55

कोलावेरी डी या गाण्याने एकच धमाल उडवून दिली आणि त्यानंतर ऐशवर्या आर धनुषच्या 3 या पदार्पणातील सिनेमाने यशाचे दिवसही पाहिले. त्यामुळे हे दोघं आता खूप मजेत आनंदात असतील असा जर तुमचा समज झाला असेल तर तो चुकीचा आहे. सुपरस्टार रजनीकांत मुलगी असलेल्या ऐशवर्या आणि धनुष यांच्यात वितुष्ट निर्माण झालं आहे आणि त्याला कारण आहे श्रृती हसन...

'कोलावेरी डी'ची पाच कोटींची भरारी!

Last Updated: Monday, March 26, 2012, 17:28

कोलावेरी डीने सोमवारी युट्युबवर ५० दशलक्ष हिट्सचा टप्पा ओलांडला आहे. धनुषच्या या अनोख्या गाण्याची क्रेझ आणि अपील अजूनही कायम असल्याचं त्यामुळे सिद्ध होतं. सोमवार संध्याकाळपर्यंत ५०,०८६,६३३ हिटसची नोंद झाली आहे. कोलावेरी डी इंटरनेटवर १६ नोव्हेंबर रोजी लँच करण्यात आलं होतं आणि एका दिवसात दहा लाख हिट्सचा विक्रम या गाण्याने नोंदवला.

'कोलावेरी डी'ला ट्रेडमार्क मिळणार

Last Updated: Wednesday, January 18, 2012, 21:23

सोनी म्युझिक एन्टरटेनमेंट गाण्याची पहिली ओळ ‘व्हाय धिस कोलावेरी डी’ चे ट्रेडमार्कसाठी अर्ज करण्याचा विचार करत आहे.

पाकमध्ये देखील 'कोलावेरी डी' ची धूम

Last Updated: Wednesday, December 28, 2011, 22:43

‘ कोलावेरी डी’ च्या चालीवर बेतलेलं ‘व्हेअर इज डेमोक्रसी, डेमोक्रसी, डेमोक्रसी जी’ हे गाणं अर्थातच सध्या पाकिस्तानात धूमाकुळ घालत आहे. पाकिस्तानी सरकार आणि लष्करावर मजेशीर शब्दात निशाणा साधणारं हे गाणं लोकप्रिय झालं नाही तर नवलच.

जपानी पीएमना 'कोलावेरी डी'चा नजराणा

Last Updated: Wednesday, December 28, 2011, 17:11

नुषच्या ‘कोलावेरी डी’ या गाण्याने जगभरात धूम मचवली आहे. या टँगलिश (तमिळ कम इंग्लिश) गाण्याला यू ट्युबवर तब्बल २० दशलक्ष हिट्स मिळाल्या आहेत. लोकांना 'कोलावेरी डी'ने अक्षरश: वेडं करुन सोडलं आहे.

उभारता गायक नेवान निगम

Last Updated: Tuesday, December 6, 2011, 16:57

सोनू निगमच्या चार वर्षाच्या मुलाने नेवानने देखील कोलावेरी गाऊन धमाल उडवून दिली आहे. नेवानने त्याच्या शैलीत गायलेल्या कोलावेरी डीने पण मुळ गाण्याप्रमाणेच लोकांना वेड लावलं आहे.

रजनीकांत दिसणार 'कोलावरी डी'मध्ये

Last Updated: Saturday, December 3, 2011, 12:19

'कोलावरी डी' या गाण्याच्या व्हिडिओमध्ये सुपरस्टार रजनीकांत झळकणार असल्याची चर्चा आहे. साक्षात् रजनीकांत या गाण्यात आपल्या करामती दाखवताना दिसणार असल्यामुळे हे गाणं नवा रेकॉर्ड करेल अशीच चर्चा बॉलिवूडपासून टॉलिवूडपर्यंत होतेय.

'कोलावेरी डी'चा फिव्हर

Last Updated: Friday, November 25, 2011, 13:53

'कोलावेरी डी' या गाण्याने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे आणि अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. यू ट्युबवर कोलावेरी डीला एका दिवसात दहा लाखाहून अधिक हिट्स मिळाल्या आहेत आणि आता पर्यंत ४०,५२,१८९ हिट्सची नोंद झाली आहे.