फिल्मी दुनियेची सफर - Marathi News 24taas.com

फिल्मी दुनियेची सफर

www.24taas.com, मुंबई
 
करिना कपूर आता संजय लीला भन्साळीबरोबर फायनली एक फिल्म करणार आहे. अनुष्का शर्माचं नशीब चांगलंच खुलतंय. तर रविना टंडन आगामी सिनेमात गाणं म्हणण्याची शक्यता वर्तवली जातेय....यासह मनोरंजन विश्वाचा थोडक्यात आढावा.
 
करिना कपूरची 13 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली.. दिग्दर्शक संजय लीला भन्साळींसोबत करिना फायनली एक फिल्म करणार आहे. भन्साळी आता रणवीर सिंग आणि करिनासोबत लवकरच नवा सिनेमा करणार आहेत..त्यामुळे बेबो सध्या आनंदात आहे.
 
अनुष्का शर्मा करियरच्या सुरुवातीपासूनच लकी ठरलीय..शाहरूख खानसोबत डेब्यु केल्यानंतर अनुष्काचं नशीब आणखीनच खुललं..यावर्षी आमीर खान,इम्रान खान, रणबीर कपूर आणि शाहरुख अशा बड्या स्टार्ससोबत ती  शूटिंग करणार आहे.
 
डॅडी कूल अजय देवगणला सध्या हवाय ब्रेक...होय..तेजनंतर अजयला थोडासा वेळ मिळालाय. सुट्ट्यांच्या मोसमात अजय काजोल आणि मुलांसोबत परदेशात फिरायला जाणार आहे..या ब्रेकनंतर तो हिम्मतवाला या फिल्मचं शूटिंग सुरु करणार आहे...
 
दबंग गर्ल सोनाक्षीचा फॅन झालाय दबंगचा दिग्दर्शक अभिनव कश्यप..आणि म्हणूनच अभिनवला नव्या फिल्मसाठी सोनाक्षीला साईन करायचंय..कारनामा या फिल्ममध्ये सोनाक्षीसोबत रणबीर कपूरला कास्ट करण्याची अभिनवची इच्छा आहे.
 
सध्या सगळेच स्टार्स सिंगर होण्याच्या मार्गावर आहेत ...रविना टंडनही यात मागे नाही..बुढ्ढा होगा तेरा बापमधून कमबॅक केल्यानंतर रविना सज्ज आहे नव्या फिल्मसाठी..रिशी देशपांडे दिग्दर्शित नव्या सिनेमात रविना गाणं म्हणण्याची शक्यता वर्तवली जातेय..
 
क्रिकेटच्या मंचावर जर दीपिका पदुकोण दिसली तरी नक्कीच कॉकटेल होईल ना? आणि काहीसं असंच चित्र दिसलं जेव्हा दीपिका पदुकोण उतरली ती क्रिकेटच्या मंचावर.....यावेळी दीपिकाने शाब्दीक फटकेबाजी करत आपल्या कॉकटेल सिनेमाचं जोरदार प्रमोशन केलं...
 
बिग बी अमिताभ बच्चन यांनी सोशल नेटवर्किंग साईटवर पेट्रोल वाढीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'रामचंद्र कह गये सिया से, ऐसा कलियुग आयेगा, गाडी खरीदोगे कॅश से, पेट्रोल लोन पे आयेगा..' अशा शब्दांत अमिताभ यांनी पेट्रोल भाववाढीला विरोध दर्शवलाय.
 
एकाच दिवशी पाच मराठी फिल्म्सची घोषणा असा अनोखा फंडा मुंबईत नुकताच पाहायला मिळाला...सत्य,सावित्री आणि सत्यवान या फिल्मचा फर्स्ट लूक रिव्हिल करण्यात आला आणि सोबत काही फिल्म्सची घोषणाही थाटात झाली..
 
फिल्मसिटीत मराठी मालिकांना एकूण फीमध्ये 50 टक्के सवलत मिळत होती.पण अचानक ही सवलत बंद केल्याने मराठी मालिकांचे निर्माते अडचणीत आले आहेत. म्हणून शिवसेनेनं आंदोलन छेडत ही सवलत 48 तासात पुन्हा सुरू केली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शिवसेनेनं दिलाय.
 
सुवासिनी मालिकेत आता नवा ट्विस्ट आलाय...विजयने आता दुसरं लग्न केलंय...शर्मिला बरोबर हे लग्न लागत असतानाच सावी आपल्या घरच्यांना घेऊन तिथे येते खरी...मात्र आता यापुढे मालिकेत खरा ट्विस्ट येणार आहे...

First Published: Tuesday, May 29, 2012, 14:52


comments powered by Disqus