Last Updated: Wednesday, May 30, 2012, 22:11
www.24taas.com, मुंबई ‘रॉक ऑन’, ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ या सारख्या सिनेमातून आपली दखल घ्ययला लावणारी प्राची देसाई यावर्षी आपल्या लागोपाठ तीन सिनेमातून भेटीला येणार आहे. तिच्या आगामी सिनेमाची तिचे चाहते चातकासारखी वाट पाहात होते.
‘तेरी मेरी कहानी’, ‘बोल बच्चन’ आणि यासह प्राची जॉन अब्राहम सोबत ‘आय, मी और मै’ हा सिनेमा करतेय. या तीनही सिनेमात आपली व्यक्तिरेखा वेगी असल्याचं प्राची सांगते.
बोल बच्चन या सिनेमातून पहिल्यांदाच प्राचीनं अभिषेकसह काम केलंय. तेव्हा छोटे मियॉँ बच्चन यांच्यासह काम करण्याचा तीचा अनुभव धमाल होता असं ती म्हणाली. आता पर्यंत नेहमीच सोज्वळ व्यक्तिरेखेत वावरलेली प्राची तेरी मेरी कहानी, बोल बच्चन आणि आय मी और मैं या तिनंही सिनेमांतून तिच्या चाहत्यांसाठी वेगळं काय आणते हे पाहणं इंट्रेस्टंग ठरणारेय..
First Published: Wednesday, May 30, 2012, 22:11