Last Updated: Thursday, May 31, 2012, 15:40
www.24taas.com, मुंबई आयपीएलच्या पाचव्या सीझनमध्ये कोलकाता नाइट रायडर्स विजयी ठरली. या विजयावर शाहरुखपासून ते ममता दीदींपर्यंत सगळ्यांनी आपला आनंद व्यक्त केला. पण पूनम पांडेनं विवस्त्र होऊन व्यक्त केलेला आनंद पाहून भल्याभल्यांनी मान खाली घातली. केकेआरच्या विजयावर पूनम पांडेने ट्विटरवर आपले विवस्त्र फोटो दाखवून एकच खळबळ उडवली. पण, हा केकेआर आणि पूनमचे विवस्त्र फोटो यांचा संबंध काय, यावर मात्र बोलण्यास शाहरुखने मौन बाळगलं आहे.
'जेव्हा भारतानं वर्ल्ड कप जिंकला, तेव्हा आम्ही मित्र आपापल्या कारवर भारताचे झेंडे लावून फिरलो... जेव्हा केकेआर जिंकली तेव्हा मी कार्टव्हील केलं... आनंद व्यक्त करण्याची प्रत्येकाची स्वतःची पद्धत असते... त्यामुळे मी यावर (पूनम पांडेच्या विवस्त्र होण्याबद्दल) काही बोलणार नाही', अशा शब्दांत शाहरुखने पूनमच्या विवस्त्र फोटोवर आपलं मत मांडलं.
केकेआरने आयपीएल-५ मध्ये चेन्नई सुपर किंग्जवर विजय मिळवला. त्यानंतर ट्विटरवर आपलं नग्न फोटो प्रकाशित करून पूनमने त्याआधी लिहिलं होतं, 'वॉव... मी ज्या संघाला पाठिंबा देते, तोच संघ नेहमी जिंकतो. #आयपीएल, #एसआरके मी वचन दिल्याप्रमाणे मी माझा असा फोटो तुम्हाला दाखवत आहे.'
.
First Published: Thursday, May 31, 2012, 15:40