शाहरूख सेल्समन – बिग बी - Marathi News 24taas.com

शाहरूख सेल्समन – बिग बी

www.24taa.com , मुंबई
 
हिंदी अभिनेता शाहरूख खान हा  सेल्समन आहे. मात्र, तसा नाही, असे मत  बिग बी अमिताभ बच्चन यांने व्यक्त केले आहे. त्यामुळे शाहरूख काय उत्तर देतो याकडे लक्ष लागले आहे.
 
शाहरूख  सिनेमाच्या प्रमोशनसाठी वाटेल तिथे जाणे, फक्त पैशासाठी जाहिरातबाजी करणे आणि स्वत:विषयी चांगल्या बातम्या प्रसिद्ध होतील याची काळजी घेणे, अशी सेल्समनशिप मी करीत नाही आणि मला जमणारही नाही, असे फटकारे  अमिताभने आपल्या ब्लॉगमधून लगावले आहेत.
 
सिनेमाच्या निर्मितीवर जितका खर्च होतो तितकाच प्रचंड खर्च प्रसिद्धीवर केला जात आहे. मी स्वत:ही वेळोवेळी स्वत:च्या सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी प्रयत्न जरूर केले आहेत, पण शाहरूख खान किंवा अक्षय कुमारप्रमाणे सेल्समन बनून वाट्टेल त्या पद्धतीने सिनेमा विकण्याचा प्रयत्न कधीही केलेला नाही असे अमिताभचे म्हणणे आहे.
 
लोकांनी सिनेमा पाहावा यासाठी मीडियाच्या मदतीने बातम्या पेरण्याचे प्रकार वाढले आहेत. प्रेक्षकांना सिनेमाकडे आकर्षित करण्यासाठी असंख्या क्प्त्या केल्या जातात. यातील अनेक प्रकारांचा तर मी विचारही करू शकत नाही असेही अमिताभ यांनी ब्लॉगमध्ये नमूद केले आहे.

First Published: Saturday, June 2, 2012, 15:38


comments powered by Disqus