Last Updated: Wednesday, June 6, 2012, 18:03
www.24taas.com, गोवा यंदाच्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाला ८ जूनपासून सुरुवात होतेय. महोत्सवाचं उद्घाटन दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या हस्ते होणार आहे. एकूण १७ दर्जेदार चित्रपट या महोत्सवात दाखवली जाणार आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठी चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. यंदा ८ जून ते १० जूनपर्यंत हा महोत्सव गोव्यात रंगणार आहे. महोत्सवाचा प्रारंभ नितीन देसाई दिग्दर्शित ‘अजिंठा’ या सिनेमानं होईल. तर चिंटू, मसाला, देऊळ, शल्य, कथा तिच्या लग्नाची, शाळा यासारखे दर्जेदार सिनेमे महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत.
दर्जेदार चित्रपटांच्या मांदियाळीत रंगणाऱ्या मराठी चित्रपट महोत्सवाच्या या मेजवानीसाठी प्रेक्षकही तितकेच उत्सुक आहेत.
First Published: Wednesday, June 6, 2012, 18:03