उभारता गायक नेवान निगम - Marathi News 24taas.com

उभारता गायक नेवान निगम

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 

धनूषच्या कोलावेरी डी ने धुमाकूळ घातला आहे आणि देशभरात लोकं या गाण्याने वेडे केलेत. सोनू निगमच्या चार वर्षाच्या मुलाने नेवानने देखील कोलावेरी गाऊन धमाल उडवून दिली आहे.
 
नेवानने त्याच्या शैलीत गायलेल्या कोलावेरी डीने पण मुळ गाण्याप्रमाणेच लोकांना वेड लावलं आहे. नेवानने गायलेल्या गाण्याच्या व्हिडोओला एका दिवसात ८३,००० लोकांचा चाहता वर्ग लाभला आहे.
 
नेवानने गायलेल्या गाण्यात एक खेळकर आणि निरागास बाज आहे आणि त्यामुळेच ते सर्वांना आवडलं आहे. नेवानच्या गाण्याने लोकांची मनं जिंकली आहेत. बाप से बेट सवाई म्हणतात ते काही उगीच नाही. सोनूला घरातूनच स्पर्धक निर्माण झालं आहे हे मात्र खरं.

First Published: Tuesday, December 6, 2011, 16:57


comments powered by Disqus