ऐश्वर्या पुन्हा पडद्यावर रुजू - Marathi News 24taas.com

ऐश्वर्या पुन्हा पडद्यावर रुजू

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
ऐश्वर्या राय सध्या आपल्या मुलीच्या संगोपनात रमली आहे. मात्र याचबरोबर ऐश्वर्याने आपल्या करीअरवर अजिबात दुर्लक्ष केललं नाही. या शॉर्ट अँड स्वीट ब्रेकनंतर ऐश्वर्या पुढच्या वर्षी मार्चपर्यंत आपल्या आगामी सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. ऐश्वर्या संजय लीला भन्साळीच्या सिनेमापासून शूटिंगला सुरूवात करणार असल्याचीही चर्चा आहे.
 
खरंतर डेव्हिड धवन यांच्या आगामी 'लेडिज एँड जेन्टलमेन' या सिनेमातही ऐश्वर्या प्रमुख भूमिका साकारतेय. मात्र या सिनेमाऐवजी ऐश्वर्या संजय लीला भन्साळीच्या सिनेमापासून शूटिंगला सुरुवात करणार आहे. संजयसह ऐश्वर्याने गुजारिश, हम दिल दे चुके सनम, देवदास यासारखे  हिट तसंच वेगळ्या धाटणीचे चित्रपट दिलेले आहेत . त्यामुळे ऐश्वर्याने डेव्हिड धवनऐवजी संजय लीला भन्साळीला झुकतं माप दिल्याची चर्चा आहे.
 
मधुर भंडारकरच्या  हिरॉइन या सिनेमातही आधी ऐश्वर्याच काम करणार होती. मात्र मातृत्वाची चाहूल लागल्यावर तिने हा सिनेमा सोडून दिला होता. आता मुलीच्या जन्मानंतर मात्र पुन्हा तिच्याकडे नव्या सिनेमांच्या ऑफर्स यायला सुरूवात झाली आहे. संजय लीला भंसाळीवरोबर करत असलेल्या या सिनेमाबाबत ऐश्वर्या सध्या काहीही बोलण्यास तयार नसली तरी लवकरच ऐश्वर्या शूटिंगला सुरूवात करतेय हे मात्र नक्की.
 

First Published: Wednesday, December 7, 2011, 03:16


comments powered by Disqus