Last Updated: Tuesday, June 12, 2012, 08:40
www.24taas.com, मुंबई धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांची मुलगी ईशा देओल ही येत्या २९ तारखेल्या विवाह बंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बांद्रास्थित उद्योगपती भरत तख्तानी याच्यासोबत ईशा डेटींग करत होती. राजकारण आणि बॉलिवूडमध्ये सक्रीय असलेलं या घराण्यानं मात्र विवाह सोहळा साध्या पद्धतीनं करण्याचा निर्णय घेतलाय. हे लग्न एका मंदिरात पार पडणार आहे.
२ फेब्रुवारी रोजी हेमामालिनीच्या बंगल्यावर ईशा आणि भरतचा साखरपुडा पार पडला होता. या सोहळ्यासाठीही काही जवळच्याच लोकांची उपस्थिती होती. नेहमीच आपलं पर्सनल लाईफ ‘पर्सनल’ ठेवणाऱ्या हेमानं या वेळीही ईशाचं लग्न मंदिरात करण्याचा निर्णय घेतलाय. ‘लग्नाची तयारी सुरू झालीय. आम्ही खूप खूश आणि उत्सुक आहोत. लग्न २९ जूनला एका मंदिरात पार पडणार आहे. आम्हाला हे लग्न मंदिरातच करायचं आहे.’ असं हेमामालिनीनं सांगितलंय.
लग्न फार थाटामाटात नसलं तर ३० जून रोजी आयोजित करण्यात आलेलं रिसेप्शन एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये असेल. यासंबंधी माहिती देताना हेमानं सांगितलं, ‘रिसेप्शनसाठी फिल्म, उद्योग आणि राजकारणातले अनेक लोक सहभागी होतील.’ आपल्या ‘टेल मी ओ खुदा’ या सिनेमानंतर ईशानं लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
.
First Published: Tuesday, June 12, 2012, 08:40