चिरंजीवीचा मुलगा अडकला... विवाहबंधनात - Marathi News 24taas.com

चिरंजीवीचा मुलगा अडकला... विवाहबंधनात

www.24taas.com, हैदराबाद 
 
तेलगू सुपरस्टार आणि खासदार चिरंजीवी यांचा मुलगा रामचरण तेजा आणि त्याची बालपणीची मैत्रीण उपासना यांचा विवाहसोहळा मोठ्या थाटमाटात पार पडला. या सोहळ्यासाठी अनेक केंद्रीय मंत्री तसंच बॉलीवूड आणि टॉलिवूडच्या कलाकारांनी हजेरी लावली. केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनीही उपस्थित राहून वधू-वरांना आशिर्वाद दिले.
 
सुपरस्टार चिरंजीवीचा मुलगा रामचरण तेजा यानंही अनेक तामिळ चित्रपटांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिलीय. त्याची पत्नी उपासना ही अपोलो हॉस्पिटलचे सहसंस्थापक सी. प्रताप रेड्डी यांची नात आहे. बालपणापासून तेजा आणि उपासना यांची घट्ट मैत्री आहे. या मैत्रीचं रुपांतर त्यांनी विवाहबंधनात केलं.
 
तेजाच्या अनेक तेलगू चित्रपटांनी त्याला टॉलिवूडचा स्टार बनवलंय. यानंतर तो बॉलिवूडमध्येही एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे. सध्या एका हिंदी चित्रपटाचीही तयारी तेजा करतोय. हा सिनेमा म्हणजे अमिताभ बच्चन यांनी अजरामर केलेला सिनेमा ‘जंजीर’चा रिमेक असेल. तेजा स्वत:ही या चित्रपटाबद्दल उत्सूक आहे.
 
.

First Published: Thursday, June 14, 2012, 11:20


comments powered by Disqus