विद्याचा भाव वधारला ! - Marathi News 24taas.com

विद्याचा भाव वधारला !


झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
सध्याची आणि सगळ्यांची हॉट फेव्हरेट विद्या बालन आता भावखाऊ झालीय. विद्यानं आपल्या आगामी फिल्मसाठी तब्बल २ कोटींचं मानधन घेतलंय. विद्याच्या 'डर्टी पिक्चर'ने सध्या बॉक्स ऑफीसवर चांगलाच धुमाकुळ घातलाय. या सिनेमाने विद्याची साधी, सोज्वळ इमेज पूसून तिची बोल्ड इमेज तयार केलीय. प्रेक्षकांपासून ते क्रिटीक्सपर्यंत सगळ्यांनीच विद्याच्या या भूमिकेचं चांगलचं कौतुक केलंय. त्यामुळे सध्या विद्या सातवे आसमान पर आहे. या सिनेमाने विद्याला तिच्या मनासारख यश मिळवून दिलंय.
 
या यशामुळे म्हणे आता विद्याचे भाव वाढल्याची चर्चा बी टाऊनमध्ये आहे. आता विद्याने तिच्या मानधनात वाढ केली तर बिघडलं कुठे, विद्याच्या मागच्या सिनेमांवर एक नजर टाकली तर लगे रहो मुन्नाभाई, पा, इश्किया, नो वन किल्ड जेसिका आणि आत्ताचा डर्टी पिक्चर या  सगळ्या फिल्म्समध्ये विद्याने आपल्या भूमिकांमध्ये वैविध्य जपलंय. त्यामुळे तिच्या मानधनात वाढ होणं स्वाभाविकच आहे.  पा आणि इश्कियासाठी विद्याने ७५ लाख रुपये आपली फी घेतली होती. या दोन्ही सिनेमांना चांगला रिस्पॉन्स मिळाल्यानंतर विद्याने आपल्या मानधनात जवळपास दुपटीने वाढ केली, म्हणजेच 'नो वन किल्ड जेसिका' आणि 'डर्टी पिक्चर'साठी विद्याने एक कोटी पन्नास लाख रुपये मानधन घेतलं होतं.
 
मात्र आता 'डर्टी पिक्चर'ला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर  विद्याने आपली फी आणखी वाढवलीय. आता विद्याने आपलं मानधन केलंय दोन कोटी रुपये. डर्टी पिक्चरनंतर विद्याच्या हाती असलेला नवा प्रोजेक्ट म्हणजे सुजॉय घोषची 'कहानी' ही फिल्म. आपल्या प्रत्येक फिल्मप्रमाणे 'कहानी'मध्येही विद्या काहीतरी हटके करणार आहे. या सिनेमात विद्या सहा महिन्यांची प्रेग्नंट वुमन साकारतेय. 'कहानी' ही फिल्म वुमन ओरिएंटेड फिल्म आहे. त्यामुळे डर्टी पिक्चरप्रमाणे ही फिल्मही सबकुछ विद्याच असेल असंच वाटतंय. आणि या सिनेमासाठी विद्याने आपलं मानधन वाढवून घेतलंय. याही सिनेमात विद्याबरोबर स्क्रीन शेअर करतोय इम्रान हाश्मी. म्हणजेच डर्टी पिक्चरनंतर विद्या इम्रान पुन्हा एकत्र दिसणारेय. आता विद्याचं मानधन वाढलं असलं तरी तिच्या हिट फिल्म्सची लिस्ट पाहता दिग्दर्शक विद्याचा शब्द खाली पाडायला तयार नाहीत. सो, मान गए विद्या...सक्सेस कसं एन्कॅश करायचं हे तिला बरोबर कळलंय.
 

First Published: Thursday, December 8, 2011, 02:49


comments powered by Disqus