Last Updated: Sunday, June 17, 2012, 17:43
www.24taas.com, मुंबई बॉलिवूडमध्ये सलमान खान आणि आमिर खानची मैत्री म्हणजे ‘जय-वीरू’च्या मैत्रीसारखी प्रसिद्ध आहे. खरंतर सलमान खान आणि आमिर खानने फक्त एकाच सिनेमात एकत्र काम केलं आहे. मात्र, तेव्हापासून निर्माण झेली मैत्री आजही तितकीच घनिष्ट आहे.
आमिर आणि सलमान यांच्यातील मैत्रीचा प्रत्यय आपल्याला वेळोवेळी आलाच आहे. आज सलमान खानने केलेल्या ट्विटमध्येही सलमान खानने आमिर खानचं कौतुक केलं आहे. “वाह यार आमिर खान, टिलूने तो कमाल कर दिखाया, यार अब जिसको हिंदी नही आती वो जरा प्लीज इसको ट्रांसलेट करवा लेना, थँक यू” असं हिंदीत लिहून आमिर खानला शाबासकी दिली आहे. गंमत म्हणजे सलमानने यामध्ये आमिर खानचा उल्लेख टिलू असा केला आहे.
टिलू हे आमिर खानचं ‘अंदाज अपना अपना’ मध्ये ठेवलेलं एक नाव होतं. आजही सलमानच्या डोळ्यांसमोर तोच आमिर खान आहे, हे त्याच्या संबोधनावरून सिद्ध होतं. आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’मुळे प्रभावित झाल्याच्या भावना सलमान खानने व्यक्त केल्या आहेत. आमिर खानच्या या कार्यक्रमाचं दिलीप कुमार यांनीही कौतुक केलं होतं.
First Published: Sunday, June 17, 2012, 17:43