मासिकासाठी नर्गिसने केलं बिकिनी फोटोशूट - Marathi News 24taas.com

मासिकासाठी नर्गिसने केलं बिकिनी फोटोशूट

 www.24taas.com, मुंबई
 
सिंगपोर येथे झालेल्या पार्टीत रणबीर कपूरने आपली सहकलाकार असणाऱ्या अभिनेत्री नर्गिस फाक्रीकडे दुर्लक्ष केल्यामुळे नर्गिस भलतीच नाराज झालेली दिसतेय. तेव्हा जगभरातल्या पुरूषांची नजर आता तिच्याकडेच वळेल, अशी योजना नर्गिसने केली आहे. ‘एले’ या मासिकासाठी या रॉकस्टार बेबने बिकिनी फोटोशूट केलं आहे.
 
३२ वर्षीय नर्गिस फाक्रीने कमीत कमी कपडे घालून एले मासिकाचं मुखपृष्ठ चांगलंच प्रेक्षणिय बनवलं आहे. पोल्का डॉटेड लाल बिकिनी घालून नर्गिसने काही सुपर हॉट पोझेस दिल्या आहेत. या शिवाय पारदर्शक काळ्या बिकिनीमधील नर्गिसचे फोटोही या मासिकातील वैशिष्ट्य ठरलं आहे. या फोटोंमध्ये नर्गिस खूपच आकर्षक दिसली आहे.
 
नर्गिसच्या एवढ्या सेक्सी फोटोंकडे दुर्लक्ष करणं केवळ अशक्य आहे. आपला कमनिय बांधा, आकर्षक ओठ आणि मादक डोळ्यांमुळे नर्गिस कमालीची सुंदर दिसत आहे. अमेरिकन मॉडेल असणाऱ्या नर्गिसकडे रणबीर कपूर तसंच दुसरा मित्र शाहिद कपूर यांनी दुर्लक्ष केलं होतं. जर त्यांनी नर्गिसचे हे फोटो पाहिले, तर नक्कीच त्यांना आपल्या या कृत्याचा पश्चात्ताप होईल.

First Published: Tuesday, June 19, 2012, 16:47


comments powered by Disqus