सलमान खानचे नखरे - Marathi News 24taas.com

सलमान खानचे नखरे

www.24taas.com, मुंबई
 
‘एक था टायगर’च्या सेटवर सलमान खानने नवा नियम काढला होता. आणि हा नियाम ऐकून ‘बडे स्टार बडी बाते’ असं म्हणण्याशिवाय कुणाकडेच काही पर्याय राहिला नाही. नव्या नियमानुसार सलमान खानला शुटिंगसाठी सेटवर कुणीही बोलावायला यायचं नाही असं सिनेमाच्या क्रू ला सांगण्यात आलं.
 
सलमान खानने काढलेल्या नव्या नियमामुळे यशराज फिल्म्सला घाम फुटलाय. सलमान खान आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसून असतो. मात्र शॉट रेडी असला, तरीही सलमान खानला कुणीही बोलवायला यायचं नाही. सलमान खानचा जेव्हा मूड होईल, जेव्हा त्याला वाटेल, तेव्हा तो व्हॅनिटी व्हॅनमधून बाहेर येईल आणि आपला सीन करेल. त्यामुळे सेटवर करोडो खर्च करून सगळी व्यवस्था करून झाली असली, तरी सबंध युनिट सलमान खानची वाट पाहात ताटकळत पडलेलं असतं.
 
सलमान खानच्या अशा नखऱ्यांमुळे सिनेमा पूर्ण होण्यास खूपच उशिर झाला. आणि सलमानचाच आदेश असल्यामुळे कुठल्याही स्पॉटबॉयने सलमान खानला सेटवर बोलवायची हिंमत केली नाही. एक था टायगरच्या शुटिंगच्या वेळी सलमान खानने अनेक वेळा असा त्रास दिला. मोरोक्को येथे एका सीनच्या शुटिंगसाठी जायचं होतं. त्याला सलमान खानने नकार दिला. अखेर ते शुटिंग मुंबईतल्याच स्टुडिओत करावं लागलं.
 
सलमान खानला या सिनेमात काम करण्यात काडीचाही रस नाही. तो फक्त आपली प्रेयसी कतरिना कैफ हिच्यासोबत काम करता यावं यासाठी या सिनेमात काम करत आहे. त्यामुळे यशराज फिल्म्सला सलमान खानशी जर काही बोलायचं असेल, तर ते कतरिना कैफच्याच माध्यमातून बोलावं लागतंय. यशराज फिल्म्सलाही एवढा त्रास देणारा सलमान खान पहिलाच अभिनेता असेल.
 

First Published: Thursday, June 21, 2012, 15:07


comments powered by Disqus