राजेश खन्ना सुखरुप घरी परतले! - Marathi News 24taas.com

राजेश खन्ना सुखरुप घरी परतले!

www.24taas.com, मुंबई  
 
ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. आज, ‘आशिर्वाद’ या आपल्या बंगल्याच्या छतावर येऊन त्यांनी आपल्या फॅन्सचे आभारही मानले. यावेळी पत्नी डिंपल कपाडिया आणि जावई अक्षय कुमार हेही उपस्थित होते.
 
आशिर्वादच्या छतावरून त्यांनी आपल्या फॅन्सना हातानं ‘व्ही साईन’ दाखवला. यावेळी राजेश खन्ना यांना पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी बंगल्यासमोर मोठी गर्दी केली होती. यानंतर राजेश खन्ना यांचा जावई अक्षय कुमारनं बंगल्याच्या बाहेर येऊन वार्ताहरांशी संवाद साधला. यावेळी ‘त्यांची प्रकृती आता उत्तम आहे. तुमचे सर्वांचे काळजी करण्यासाठी आभार’ असं अक्षयनं म्हटलंय. राजेश खन्ना यांनीही आपल्या चाहत्यांचे आभार मानलेत.
 
पण, सुत्रांच्या माहितीनुसार राजेश खन्ना यांना अजूनही अन्न पचवणं जड जातंय. एप्रिल महिन्यात आजारी पडल्यानंतर त्यांची तब्येत जलद गतीनं खालावत गेली. राजेश खन्ना यांची मोठी मुलगी आणि अक्षय कुमार याची पत्नी ट्विंकल खन्ना ही सहा महिन्यांची गर्भवती आहे. तर त्यांची दुसरी मुलगी रिंकी ही आपल्या वडिलांसोबत राहण्यासाठी कोलकाताहून मुंबईत दाखल झाली आहे. राजेश खन्ना यांची घटस्फोटीत पत्नी डिंपल कपाडिया यांनीदेखील अशा काळात राजेशबरोबरच राहण्याचा निर्णय घेतलाय.
 
.

First Published: Thursday, June 21, 2012, 19:38


comments powered by Disqus