राजेश खन्ना पुन्हा हॉस्पिटलमध्ये... - Marathi News 24taas.com

राजेश खन्ना पुन्हा हॉस्पिटलमध्ये...

 www.24taas.com, मुंबई  
 
ज्येष्ठ अभिनेते राजेश खन्ना यांना पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय. त्यांची तब्येत प्रकृती पुन्हा एकदा ढासळल्यानं त्यांना तातडीनं मुंबईच्या लिलावती हॉस्पिटलमध्ये अडमिट करण्यात आलयं.
 
राजेश खन्ना यांना अन्न पचवणं जड जात होतं. त्यांनी अन्न-पाणीच घेणं बंद केलं होतं. पोटाच्या बिघाडामुळे त्यांची प्रकृती खालावल्याचं समजतंय. त्यांची विभक्त पत्नी डिंपल कपाडिया या सध्या त्यांच्यासोबतच आहेत.
 
दोन दिवसांपूर्वीच प्रकृतीत सुधारणा झाल्यानं राजेश खन्ना हॉस्पिटलमधून घरी परतले होते. ‘आशिर्वाद’च्या छतावरून त्यांनी आपल्या फॅन्सना हातानं ‘व्ही साईन’ दाखवला होता. यावेळी राजेश खन्ना यांना पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी बंगल्यासमोर मोठी गर्दी केली होती. यावेळी त्यांची विभक्त झालेली पत्नी डिंपल कपाडिया आणि जावई अक्षय कुमार हे त्यांच्यासोबत होते. हिंदी सिनेमाचा पहिला सुपरस्टार म्हणून राजेश खन्ना यांना ओळखलं जातं. १९६९ ते १९७२ च्या काळात लागोपाठ १५ सुपरहीट सिनेमे त्यांच्या नावावर नोंदविले गेले आहेत.
 
.

First Published: Saturday, June 23, 2012, 15:43


comments powered by Disqus