Last Updated: Wednesday, June 27, 2012, 13:03
www.24taas.com, मुंबई यंग मंडळीत आघाडीवर असलेला बॉलिवूड स्टार शाहीद सध्या सिंगल आणि खूश दिसत असला तरी त्याची आणि करिनाची एका वळणावर येऊन संपलेली लव्हस्टोरी मात्र तो अजूनही विसरू शकलेला नाही.
शाहीद कपूर आणि करिना कपूर... बॉलिवूडच्या प्रेक्षकांची आवडत्या जोडीपैकी एक जोडी... सगळ्यांपर्यंतच त्यांच्या अफेअर्सच्या चर्चा पोहचलेल्या... आक्षेपार्ह व्हिडिओसुद्धा... हे अफेअर तब्बल साडेचार वर्ष सुरू होतं आणि अचानक काहितरी बिनसलं... जोडी तुटली... पण, आयुष्यात पुढे निघून गेलेला शाहीदच्या मनात अजूनही ‘त्या’ आठवणी आहेत. पण या प्रकरणातून त्यानं काही धडेही घेतलेत. 'तेरी मेरी कहानी'च्या निमित्तानं एका वर्तमानपत्राशी संवाद साधताना हळवा झाला. या वर्तमानाच्या म्हणण्यानुसार, शाहीद बेबोमध्ये इतका गुंतला होता की त्याने या साडेचार वर्षात कधी चूकूनसुद्धा दुसऱ्या कुणाबद्दल विचार केला नाही. शाहीदला तेव्हा बॉलिवूड स्टारचा किताब मात्र मिळाला नव्हता.

‘कदाचित मी खूप चांगला बॉयफ्रेंड बनण्याच्या नादात माझ्या सह कलाकाराबरोबर उद्धटपणे वागलो. मी करिनासोबत साडेचार वर्ष रिलेशनशीपमध्ये होतो आणि पूर्णत: कमिटेडही... कुठल्या कार्यक्रमाला जाण्यासाठी किंवा नवीन फ्रेंडस् बनवण्यासाठी तर तेव्हा मला इतका वेळही मिळत नव्हता. पण आता मला खूप चांगल्या पद्धतीनं समजलंय. आणि मला असं वाटत नाहीए की यापुढे मी कधीही एक चांगला जोडीदार बनू शकतो.’ असं शाहीदनं वर्तमानपत्राशी बोलताना म्हटलंय.
पण, शाहिद सध्या मात्र आपल्या करिअरवर फोकस करतोय आणि त्यात तो आनंदीही आहे. तो म्हणतो, ‘मी कधीही मागे वळून पाहणार नाही. जे झालं त्यावरही मी नाराज नाही आणि जे सुरू आहे तेही खूप चांगलं आहे. आणि मला आता स्वत:साठी वेळही मिळतो.’ पण आता त्याच्या चाहत्यांना मात्र प्रश्न पडलाय की शाहिद यानंतर कधीच कुणाच्या प्रेमात पडणार नाही?
.
First Published: Wednesday, June 27, 2012, 13:03