'कॉकटेल' दीपिकाच्या सेक्सी फिगरचं रहस्य - Marathi News 24taas.com

'कॉकटेल' दीपिकाच्या सेक्सी फिगरचं रहस्य

www.24taas.com, मुंबई
 
आगामी 'कॉकटेल' सिनेमातील दीपिका पादूकोणची सेक्सी फिगर सिनेमाचं पहिलं ट्रेलर झळकल्यापासून चर्चेचा विषय बनली आहे. आत्तापर्यंत आलेल्या बहुसंख्य सिनेमात दीपिकाने खरंतर अंगप्रदर्शनाव्यतिरिक्त काहीच केलेलं नाही, पण आधीच्या कुठल्याही सिनेमात दीपिका इतकी हॉट दिसली नव्हती, असं तिच्या चाहत्यांचं म्हणणं आहे.
 
जेव्हा दीपिकाला तिच्या कॉकटेलमधील सेक्सी फिगरबद्दल विचारलं, तेव्हा दीपिका म्हणाली, “ ‘कॉकटेल’मधील मी साकारत असलेल्या व्हेरोनिका या कॅरेक्टरची ती मागणी होती. माझं शरीरसौष्ठव प्रमाणबद्ध असावं, अशी कथानकाचीच गरज होती. त्यासाठी मी विशेष व्यायाम आणि वेगळं डाएट करायला सुरूवात केली.”सिनेमाच्या शुटिंगसाठी अगद लंडन आणि केप टाऊनला जरी गेली असली, तरी दीपिकाने तेथील स्थानिक ट्रेनर्सकडून ट्रेनिंग घेणं चालूच ठेवलं. कधी कधी तर दिवसभर शुटिंगमुळे वेळ मिळाला नाही, तर ती अपरात्री शुटिंग संपल्यावर ती वर्क आऊट करायची.
 
या दिवसांत दीपिकाने स्वतःला मिठाईपासूनही दूर ठेवलं. सेटवर जेव्हा इतर लोक मनसोक्त जेवत होते आणि मिठाई, आईस्क्रीम यांचा अस्वाद घेत होतेच तेव्हा दीपिका मात्र अर्धपोटी व्यायाम करत असे. इतका त्याग केल्यावर दीपिकाला हवी हवीशी फिगर मिळाली आणि या फिगरचं दीपिकानेही कॉकटेलमध्ये मनमुराद दर्श घडवलं असल्याचं सांगण्यात येतंय.

First Published: Sunday, July 1, 2012, 08:44


comments powered by Disqus