'कॉकटेल गर्ल' डायनाची ब्युटी सिक्रेट्स - Marathi News 24taas.com

'कॉकटेल गर्ल' डायनाची ब्युटी सिक्रेट्स

www.24taas.com, मुंबई
 
कॉकटेलमध्ये सैफ अली खान आणि दीपिका पादूकोण यांच्यबरोबरच लक्षवेधी ठरलेला चेहरा म्हणजे डायना पेंटीचा. कॉकटेलच्या प्रोमोमध्ये तिचा चेहरा दिसल्यापासूनच तिचे लाखो फॅन्स निर्माण झाले आहेत. दीपिकाचे सेक्सी लूक्ससुद्धा डायनाच्या गोड चेहऱ्यापुढे फिके पडले आहेत. कॉकटेलमध्ये डायनाने 'मीरा' नामक तद्दन भारतीय मुलीची भूमिका साकारली आहे.
 
डायना पेंटी अशा प्रकारे पदार्पणापूर्वीच चर्चेचा विषय ठरली आहे. डायना मुंबईच्या सेंट झेवियर कॉलेजमधून ग्रॅड्युएट झाली आहे. तिने आत्तापर्यंत बऱ्याच मोठमोठ्या ब्रँड्ससाठी मॉडेलिंग केलंय. 'लाइफस्टाइल' या मासिकाशी बोलताना डायनाने आपल्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी चाहत्यांशी शेअर केल्या आहेत.
 
आपली ब्युटी सिक्रेट्स सांगताना आपल्या पर्समध्ये आपण काय काय बाळगतो, हेदेखील डायनाने लाइफस्टाइलमध्ये सांगितलं आहे. मॉडेल असूनही डायनाला डाएट करायला आवडत नाही. ती खाण्याची शौकीन आहे. मात्र, तिला स्वयंपाक करायचा कंटाळा येतो. एवढंच नव्हे तर पायातहाय हील्सचे शुज घालण्याऐवजी डायनाला चप्पलच घालायला आवडते. ही आणि आपली इतर अनेक गुपितं डायनाने या मासिकात दिली आहेत. तेव्हा ज्यांना डायनाच्या चाहत्यांसाठी तिची माहिती मिळवण्याची ही नामी संधी आहे. 13 जुलैला कॉकटेलमध्ये डायना  पेंटी पाहायला मिळेलच.

First Published: Monday, July 2, 2012, 13:43


comments powered by Disqus