कतरिना चौथ्यांदा जगातील सर्वात सेक्सी महिला - Marathi News 24taas.com

कतरिना चौथ्यांदा जगातील सर्वात सेक्सी महिला

www.24taas.com, मुंबई
फॅशन विश्वात नावाजलेल्या एफएचएम मॅगझीनने पुन्हा एकदा जगातील सर्वात सेक्सी महिला म्हणून कतरिना कैफ हिची निवड केली आहे. एफएचएमच्या यंदाच्या अंकात या बॉलिवुड बालेला हा किताब प्रदान करण्यात आला आहे. आतापर्यंत चौथ्यांदा कतरिनाची जगातील सर्वात सेक्सी महिला म्हणून निवड झाली आहे.
 
एफएचएमने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार कतरिनाने फ्रिडा पिन्टो आणि प्रियंका चोपडाला मागे टाकले आहे. कतरिनाने आपले सर्वोच्च स्थान कायम ठेवले असताना नुकतीच एका मुलीला जन्म दिलेल्या ऐश्वर्याचे नाव या यादीतून वगळण्यात आले आहे.
कतरिनाने बुम या चित्रपटातून आपल्या बॉलिवुड कारर्किदीला सुरूवात केली. कैजाद गुस्ताद यांनी लंडनमध्य एका ज्वेलरी कॅम्पेनमध्ये मॉडेलिंग करताना कतरिनाला पाहिले होते. त्यानंतर त्यांनी बुम या चित्रपटात तिला ब्रेक दिला. त्यानंतर सलमानने तिला मैने प्यार क्यू किया या चित्रपटात संधी दिली. दोघांचे सूतही जुळले होते. तशा चर्चाही बी टाऊनमध्ये होत्या. सलमाननेच तिचे करिअर सेट करण्यात मोलाची भूमिका बजावली असे म्हटले जाते.

First Published: Tuesday, July 3, 2012, 17:02


comments powered by Disqus