Last Updated: Thursday, July 5, 2012, 08:25
www.24taas.com, मुंबई 
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आमटे यांच्या जीवनावर आधारीत सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे. या सिनेमाचं नाव डॉक्टर प्रकाश बाबा आमटे असं असून या सिनेमात प्रकाश आमटे यांची भूमिका अभिनेता नाना पाटेकर साकारणार आहेत...
तर मंदाकिनी आमटे यांची भूमिका मृणाल कुलकर्णी साकारणार आहे. प्रकाश आमटे यांच्यावर सिनेमा करायला मिळणं ही चांगली गोष्ट असल्याची प्रतिक्रिया नाना पाटेकरने व्यक्त केली आहे.
चंद्रपूर सारख्या दुर्गम भागामध्ये डॉ. प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांनी केलेलं समाजकार्य हे अफाट आहे. आणि या सिनेमाच्या निमित्ताने त्यांना दिलेली ही आगळीवेगळी मानवंदनाच आहे. समृध्दी पोरे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.
First Published: Thursday, July 5, 2012, 08:25