रितेश-जेनेलियाचे शुभमंगल पाच फेब्रुवारीला - Marathi News 24taas.com

रितेश-जेनेलियाचे शुभमंगल पाच फेब्रुवारीला

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझाचे शुभमंगल ५ फेब्रुवारी २०१२ होणार असल्याच्या वृत्ताला सूत्रांनी दुजोरा दिला आहे. रितेश आणि जेनेलियाचे प्रेमप्रकरणाची दशकपूर्ती झाली. परीकथे सम असलेल्या प्रेमप्रकरणाची परिणीती विवाहात होणार आहे. 'तुझे मेरी कसम' या सिनेमाद्वारे दोघांनीही सिनेसृष्टी पदार्पण केलं होतं. रितेश आणि जेनेलियाचा विवाह सोहळा चार दिवस चालणार आहे. मेहंदी सोहळा तीन फेब्रुवारीला तर संगीत चार तारखेला होणार आहे.
 
विवाह सोहळ्यासाठी पाच तारिख निश्चित करण्यात आली असून सहा तारखेला स्वागत समारंभ संपन्न होईल. या विवाह सोहळ्यासाठी उपनगरातील दोन पंचतारांकित हॉटेल्स बुक करण्यात आली आहेत. देशमुख आणि डिसूजा कुटुंबियांना या विवाह सोहळ्याचा फार गाजावाजा करायचा नव्हता. पण माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांमुळे निमंत्रितांची यादी मोठी असेल आणि अनेक दिग्गज या सोहळ्याला हजेरी लावतील. रितेश आणि जेनेलिया या दोघांनीही शुटिंग शेड्युलमधून दोन महिन्यांची सूट्टी घेतली आहे.

First Published: Tuesday, December 13, 2011, 13:45


comments powered by Disqus