Last Updated: Thursday, September 29, 2011, 13:02
झी २४ तास वेब टीम, मुंबईहिंदी चित्रपटसृष्टीतील तरुण पिढीचा प्रतिनिधी अभिनेता रणबीर कपूर याला त्याच्या वाढदिवसानिमित्त अभिनेता संजय दत्तने तब्बल ३० लाख रुपयांची बाईक भेट म्हणून दिली.
रणबीरचा काल २९वा वाढदिवस होता. यानिमित्ताने रणबीरच्या 'रॉकस्टार' या आगामी चित्रपटाचे निर्माते 'अष्टविनायक'तर्फे पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात चित्रपटसृष्टीतील अनेक तारेतारका उपस्थित होते. ५२ वर्षीय संजय दत्तही या पार्टीमध्ये उपस्थित होता.
रणबीरला आश्चर्याचा धक्का देत संजयने त्याच्यासाठी भेट म्हणून चक्क ३० लाख रुपये किंमतीची बाईक आणली होती.
First Published: Thursday, September 29, 2011, 13:02