Last Updated: Thursday, July 12, 2012, 13:59
www.24taas.com, मुंबई आमिर खानच्या 'सत्यमेव जयते' या कार्यक्रमाला मिळणारा प्रतिसाद जबरदस्तच आहे. या शोमुळे आमिरच्या चाहत्यांमध्ये वाढ तर झालीच आहे. पण, त्याला सामाजिक प्रश्नांबद्दल असणारी कळकळ हीदेखील कौतुकाचा विषय बनली आहे. अनेक सरकारी अधिकाऱ्यांनी आमिर खानच्या पावलावर पाऊल ठेवून समाजात बदल घडवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
आधी आमिर खान अभिनेता होता. सुपरस्टार होता. पण आता तो एक भारताचं राष्ट्रीय प्रतीक बनला आहे. आमिरचे बॉलिवूडमध्येही अनेक चाहते आहेत. त्यातलाच एक आहे बॉलिवूडचा आचरट खलनायक शक्ती कपूर. शक्ती कपूरची स्वतःची प्रतिमा जनमानसात कशीही असली आणि त्याचं वागणं कितीही वादग्रस्त असलं, तरी शक्ती कपूरने आपल्याला देशाची काळजी असल्याचं दाखवायला सुरूवात केली आहे. शक्ती कपूरची अशी इच्छा आहे, की आमिर खानने पुढील निवडणूक जिंकून पंतप्रधान व्हावं. यासाठी शक्ती कपूरने कॅम्पेनिंग करायलाही सुरूवात केली आहे.
शक्ती कपूर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाला, “आमिर अत्यंत जबरदस्त काम करत आहे. मी तर त्याला हवी ती मदत करायला तयार आहे. आजसामान्य माणसांच्या आयुष्यातील प्रश्नांवर जगात कोण बोलतं? माझ्या दृष्टीने आमिर खान हा खराखुरा हिरो आहे आणि त्यानेच भावी पंतप्रधान व्हावं असं मला वाटतं.”
First Published: Thursday, July 12, 2012, 13:59