Last Updated: Friday, July 13, 2012, 12:33
www.24taas.com, मुंबईकतरिनाच्या तर कुणीही प्रेमात पडू शकतं, असं म्हणणं आहे अभिनेता सलमान खानचं.
एक था टायगर या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रचारदौऱ्यादरम्यान सलमाननं म्हटलंय की, ‘मला वाटतं की कतरिनाच्या कुणीही प्रेमात पडू शकतं. तिचे चाहतेही तिच्यावर खूप प्रेम करतात’. आता ही गोष्ट वेगळी की तिच्या चाहत्यांमध्ये सल्लूचाही समावेश आहे. पण हे मात्र तो स्पष्टपणे सांगत नाही.
‘कतरिनानं एखाद्या सिनेमातलं एखादं गाणं जरी केलं तरी तिचे चाहते तिला डोक्यावर उचलून घेतात, तीच्या कामाला दाद देतात आणि तो सिनेमाच हिट होऊन जातो. बॉडीगार्ड आणि अग्निपथमध्येही हेच तर झालंय.’ असं सलमान खाननं म्हटलंय. अर्थात यशराज प्रोडक्शनच्या 'एक था टायगर' चित्रपटात एकत्र काम करताना दोघं दिसतायत म्हणजे सल्लूला कतरिनाचं कामाच्या तर नक्कीच प्रेमात पडलाय. पण, तो कतरिनाच्याही प्रेमात आहे काय?
First Published: Friday, July 13, 2012, 12:33