Last Updated: Wednesday, July 18, 2012, 16:47
www.24taas.com, मुंबई 'जिस्म-२'मध्ये अति उत्तेजीत दृश्य दाखविण्यात आले आहेत. त्यामुळे हा चित्रपट आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटाची निर्माती-दिग्दर्शक पुजा भट्ट हिने चित्रपटातील भडक दृश्य काढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सेंन्सॉर बोर्ड आणि पुजा भट्ट आता कलगितूरा रंगणार आहे. या चित्रपटाची नायिका आहे, पॉर्न स्टार सनी लिओन आहे. त्यामुळे या चित्रपटाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
'जिस्म-२' वरुन पुजा भट्ट आणि सेंन्सॉर बोर्ड यांच्यात वाद सुरु झाला आहे. सेंन्सॉर बोर्डाने चित्रपटातील बोल्ड सीन्स कमी करण्याची सूचना केली आहे. मात्र, आपण असे काही करणार नाही, असे म्हणत पुजा सेंन्सॉर बोर्डापुढे झुकायला तयार नाही. यामुळे पुढील महिन्यात १३ तारखेला 'जिस्म-२' रिलीज होईल की नाही याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.
सेंन्सॉर बोर्डाने पुजाला चित्रपटातील बोल्ड सीन ५० टक्के कमी करण्याची सूचना मंगळवारी सायंकाळी केली आहे. जर ही दृश्य कापली नाही तर चित्रपटाला प्रमाणपत्र दिले जाणार नसल्याचे सेंन्सॉर बोर्डाने म्हटले आहे.
First Published: Wednesday, July 18, 2012, 16:47