रणबीर... कतरिना... घर आणि रात्र! - Marathi News 24taas.com

रणबीर... कतरिना... घर आणि रात्र!

www.24taas.com, मुंबई
अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफ आपले संबंध मीडियापासून दूर ठेवण्याचा खूप प्रयत्न करतात. पण काय करणार बिचारे कोण ना कोण त्यांना पकडतंच... आणि खरं काय ते बाहेर येतंच... आत्ताचंच बघा ना, नुकतंच एका व्यक्तीनं कतरिनाला रात्री उशीरा लपतछपत रणबीरच्या घरातून बाहेर पडताना पाहिलं... आणि हे त्या व्यक्तीनं फेसबूकवरही जाहीर करून टाकलंय.
 
या व्यक्तीनं फेसबूकवर म्हटलंय की, शुक्रवारी आपण आपल्या भावाच्या घरी थांबलो होतो. भावाचं घर ‘कृष्णाराज’च्या समोरच्याच इमारतीत आहे. मी कारमधून बघितलं तेव्हा रणबीरच्या घराचा दरवाजा खुला होता.’
 
रात्री साडे दहाच्या सुमारास रणबीरच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचं पाहून ही व्यक्ती रणबीरला पाहायला मिळणार म्हणून खूश झाली आणि त्याची वाट पाहत तिथंच उभी राहिली. पण, थोड्याच वेळात या रणबीरच्या फॅनचा भ्रमनिरास झाला. कारण, या व्यक्तीला रणबीरच्या घरातून रणबीर नाही तर कतरिना बाहेर पडताना दिसली.
 
या व्यक्तीला तर पहिल्यांदा ही कतरिना आहे यावर विश्वासच बसला नाही. पण, सलमान खानचं कतरिनावरच प्रेम आणि त्यानं कतरिनाला दिलेल्या महागड्या गाडीचा किस्सा या व्यक्तीनं एका वर्तमानपत्रात पाहिलं होतं. त्यामुळे जेव्हा ऑडी कार – ८८२२ बघितल्यावर या व्यक्तीला लगेचच समजलं की ती दुसरी तिसरी कुणी नसून कतरिनाच आहे... आता बोला... काय काय करावं लागतं या सेलिब्रिटीजना आपल्या खाजगी गोष्टी खाजगी ठेवण्यासाठी आणि इतकं सगळं करूनही त्या खाजगी मात्र राहत नाहीत, हेच खरं... असो.
 
.

First Published: Saturday, July 21, 2012, 19:53


comments powered by Disqus