'हलकट जवानी' 'चिकनी चमेली'पेक्षा हॉट? - Marathi News 24taas.com

'हलकट जवानी' 'चिकनी चमेली'पेक्षा हॉट?

www.24taas.com, मुंबई
 
‘अग्निपथ’मधील कतरिना कैफची मादक ‘चिकनी चमेली’ पाहून भल्याभल्यांची झोप उडाली होती. मधुर भांडारकर याच्या आगामी हिरॉइन सिनेमात करीना कपूर याहून हॉट अवतारात दिसणार आहे. आपला आयटम डान्स कतरिनाच्या डान्सपेक्षा चांगला व्हावा, यासाठी करीनाने विशेष मेहनत घेतली आहे.
 
हिरॉइन सिनेमासाठी करीना कपूरने प्रचंड मेहनत केली आहे, हे तर आधीपासूनच कानांवर येत होतं. त्यात तिचं आयटम साँग ‘हलकट जवानी’ या गाम्याचे काही फोटो जेव्हा प्रसारीत झाले, तेव्हाच हे गाणं किती हॉट असेल, याची कल्पना येऊ लागली होती. मात्र करीनाने हे गाणं कतरिनाहून सुंदर करण्याचं ठरवलं होतं आणि त्यासाठी विशेष मेहनत घेतली.
 
कतरिनाच्या सुंदर आणि मादक डान्सचेच नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांनाच ‘हलकट जवानी’साठी पाचारण करण्यात आलं आहे. चिकनी चमेलीपेक्षा मादक अदा या गाण्यात पेरून देशभरात या गाण्याने खळबळ माजवून दिली पाहिजे, असं मधुर भांडारकरनेच गणेश आचार्यला सांगितल्याचं बोललम जात आहे. तेव्हा बेबोची ‘हलकट जवानी’ कॅटच्या ‘चिकनी चमेली’ला मात देईल का हेच पाहायचंय..

First Published: Sunday, July 22, 2012, 23:19


comments powered by Disqus