Last Updated: Tuesday, July 24, 2012, 13:02
www.24taas.com, मुंबई ‘हिरोईन’च्या मादक अदांनी पहिल्याच फटक्यात अनेकांना घायाळ केलंय. मधूर भांडारकर दिग्दर्शित ‘हिरोईन’ या सिनेमाचा फक्त एक पोस्टर नुकताच प्रसिद्ध झालाय आणि या पोस्टरमधल्या हॉट करिनानं मात्र अनेकांची झोप उडवलीय.
बॉलिवूडची ‘हिरोईन’ करिना कपूर आपल्या मोहक आणि उत्तेजक रुप घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या समोर उभी राहणार आहे. या सिनेमात करिनाची अनेक रुपं पाहायला मिळणार आहेत आणि करिनाची ही रुपं पाहून प्रेक्षकांची मात्र तारांबळ उडणार असंच दिसतंय. कारण, ‘हिरोईन’ सिनेमाचं पहिलं वहिलं पोस्टर प्रसिद्ध झालंय. या पोस्टरमधल्या बिछान्यावर सोनेरी रंगाचा सिल्क ड्रेस परिधान करून पहुडलेल्या ‘हिरोईन’नं आत्तापर्यंत अनेकांना घायाळ केलंय. करिनाचं हेच पोस्टर इंटरनेटवर सर्वात हिट पोस्टर ठरलंय.
या पोस्टरमध्ये सोनेरी सिल्की ड्रेस घातलेल्या मादक करिनाच्या आजुबाजूला फिल्मी मासिकं पडलेली दिसतायत. दारुचा एक रिकामा ग्लासही सोबतीला आहेच... ‘हलकट जवानी’ हे गाणँ करिनावर याच ड्रेसमध्ये चित्रित केलं गेलंय. सिनेमाचा हा पहिला पोस्टरच या सिनेमाची स्टोरी काय असेल याचा अंदाज देतो. यामुळे चमेली आणि छम्मक छल्लोची तुम्हाला जरुर आठवण होईल.
मधूर भांडारकर दिग्दर्शित हिरोईनमध्ये सुरुवातीला ऐश्वर्या राय-बच्चन ‘हिरोईन’चा रोल निभावत होती. पण, बाळाची चाहूल लागल्यानंतर मात्र तीनं मधूरच्या या महत्त्वकांक्षी प्रोजेक्टला बाय-बाय केलं. त्यानंतर चिडलेल्या मधूरनं करिनाला हिरोईनच्या रोलसाठी साईन केलं.
.
First Published: Tuesday, July 24, 2012, 13:02