'शान'दार 'सतरंगी रे'चं म्युझिक लाँच - Marathi News 24taas.com

'शान'दार 'सतरंगी रे'चं म्युझिक लाँच

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
'सतरंगी रे' हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झालाय. या सिनेमाचा म्युझिक लाँच सोहळा नुकताच पार पडला. या म्युझिक लाँचच्यावेळी या सिनेमाची संपूर्ण टीम आवर्जून उपस्थित होती.
 
तरुणाईचा सळसळता उत्साह आणि धमाल मस्ती 'सतरंगी रे' या सिनेमात अनुभवायला मिळणार आहे . या सिनेमाचं म्युझिक नुकतंच लाँच करण्यात आलं. या सिनेमाला अजय नाईक यांनी संगीत दिलंय. या सिनेमात आठ वेगवेगळ्या पठडीतली गाणी आहेत. युथफुल संगीत हा या सिनेमाचा प्लस पॉईंट आहे आणि हे या सिनेमाच्या कलाकारांनी मान्य केलंय. या सिनेमाच्या म्युझिक लाँचला 'शान'ही उपस्थित होता शानने या सिनेमामध्ये ३ गाणी गायली आहेत.
 

वेगवेगळ्या जॉनरची गाणी 'सतरंगी रे' या फिल्ममध्ये ऐकायला मिळणार आहेत. त्यामुळे या संगीताला तरुणाई कसा प्रतिसाद देते हेच पाहायचंय.

First Published: Friday, December 16, 2011, 11:50


comments powered by Disqus