Last Updated: Friday, July 27, 2012, 10:50
www.24taas.com, मुंबईया वीकेण्डला कोणकोणत्या फिल्म्स आपल्या भेटीला येतायत याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल ना... मग पाहूया आमचा हा रिपोर्ट...
या वीकेण्डला प्रेक्षकांना मिळणार आहे ‘सुपरकूल’ ट्रीट... कारण रितेष देशमुख आणि तुषार कपूरचा ‘क्या सुपर कूल है हम’ रिलीज होतोय... या चित्रपटाच्या निमित्तानं २००५ साली आलेल्या ‘क्या कूल है हमट या फिल्मचा सिक्वल घेऊन आलीय एकता कपूर... ‘क्या सुपर कूल है हम’ ही नटखट कॉमेडी प्रेक्षकांना खळखळून हसवील अशी आशा करूया.
छोट्या दोस्तांसह मोठ्यांनाही पोट धरून हसवायला लावणारी ‘आइस इज फोर कॉन्टिनेन्टल ड्रीफ्ट’ ही फिल्मदेखील या आठवड्यात रिलीज होतेय. ही अॅनिमेटेड थ्रीडी फिल्म प्रेक्षकांचं 100 टक्के मनोरंजन करण्यात यशस्वी होईल अशी खात्री वाटते.
यासोबत मराठीत प्रदर्शित होत आहेत दोन सिनेमे... सचित पाटील, अमृता पत्की आणि श्रुती मराठे यांचा ‘सत्य, सावित्री आणि सत्यवान’ हा सिनेमा भेटीला येतोय. तर संजय नार्वेकरचा ‘हर हर महादेव’ हा सिनेमाही याच आठवड्यात प्रदर्शित होतोय.
एकंदर कॉमेडी, थ्रीडी आणि सस्पेन्सनं भरलेला हा वीकेण्ड प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील यात शंका नाही.
.
First Published: Friday, July 27, 2012, 10:50