धक्कादायक: माजी पोलीस आयुक्तांच्या घरात सेक्स रॅकेट

Last Updated: Monday, June 2, 2014, 15:32

मुंबई पोलिसांनी एक सेक्स रॅकेट उधळून लावलंय. पण धक्कादायक बाब म्हणजे हे सेक्स रॅकेट ज्या फ्लॅटमध्ये चालवलं जात होतं तो फ्लॅट मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि भाजपचे खासदार सत्यपाल सिंह यांचा असल्याचं उघडकीस आल्यानं पोलीस आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

`एचडीएफसी` अध्यक्ष दीपक पारिख आयपीएलचे विशेष सल्लागार

Last Updated: Saturday, April 12, 2014, 14:44

बीसीसीआई-आयपीएल चे अंतरिम अध्यक्ष सुनील गावस्कर यांनी शुक्रवारी `हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन (एचडीएफसी)चे अध्यक्ष दीपक पारिख यांना `इंडियन प्रीमियर लीग`च्या सातव्या सत्रासाठी आपला विशेष सल्लागार म्हणून निवडलंय.

आता भारत सरकारही सुरू करणार `सत्यमेव जयते`!

Last Updated: Sunday, April 6, 2014, 19:48

एकीकडे अभिनेता आमिर खानचा शो `सत्यमेव जयते` प्रसिद्ध होत असतांना दुसरीकडे केंद्र सरकार आपल्या संदेशाचा सन्मान होण्यासाठी प्रयत्न करतोय.

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिरनं केलं मरणोत्तर अवयवदान

Last Updated: Monday, March 31, 2014, 14:01

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा चित्रपटांव्यतिरिक्त सामाजिक कार्यातही तितकाच परफेक्ट असतो. नुकताच आमिरनं मरणोत्तर अवयवदान केलंय. शनिवारी केईएम रुग्णालयात आयोजित एका कार्यक्रमात आमिर हा निर्णय घेतला. आमिर खान सध्या त्याच्या `सत्यमेव जयते` या कार्यक्रमाद्वारे समाजात एक नवा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित त्यातलंच त्याचं हे एक पाऊल असेल.

आमिर खान `सत्यमेव जयते`मुळे अडचणीत

Last Updated: Tuesday, March 4, 2014, 15:54

अभिनेता आमीर खान त्याच्या `सत्यमेव जयते`मुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाच्या दुसर्‍या सिझनमधील पहिल्याच भागात त्याच्याकडून न्यायप्रविष्ट खटल्याबाबत भाष्य केल्याने न्यायालयाचा अवमान केल्याचे संकट येऊ शकते. तसे कायदे तज्ज्ञांचे मत आहे.

मुंबई पोलीस आयुक्तपदी विजय कांबळे ?

Last Updated: Thursday, February 13, 2014, 10:42

मुंबई पोलीस आयुक्तपदी विजय कांबळे यांची निवड निश्चित असून आज दुपारी त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा होणार असल्याची माहिती झी मीडियाच्या सूत्रांनी दिलीय. सत्यपाल सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्तपद गेल्या १२ दिवसांपासून रिक्त आहे.

५४ हजारांचं घर... स्वप्न आणि सत्य!

Last Updated: Thursday, February 6, 2014, 11:20

मुंबईत सामान्य माणसाचं घराचं स्वप्न हे शेवटी स्वप्नच राहिलं... पवईतल्या हिरानंदानीमधल्या घराचं स्वप्न आणि पवईच्या हिरानंदानीमधलं सत्य यामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे.

मला नेहमी ज्ञानाची भूक असते - सत्या नडेला

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 17:57

मायक्रोसॉफ्टचे प्रमुख बिल गेटस यांनी सत्या नडेला यांच्या नावाची घोषणा केली, तेव्हा बिल गेटस म्हणाले, मायक्रोसॉफ्टसमोर भविष्यात आणखी मोठी आव्हानं आहेत.

सीईओ सत्या, कसोटी क्रिकेट आणि रशियन कादंबरी

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 17:47

मायक्रोसॉफ्टचे नवे सीईओ सत्या नडेला यांचं क्रिकेटशी अनोखं नातं आहे. क्रिकेटने आपल्याला भरपूर काही शिकवलं असं नडेला यांनी म्हटलं आहे. नडेला यांना सर्वात जास्त कसोटी क्रिकेट आवडतं.

भारतीय वंशाच्या नाडेलांच्या हातात `मायक्रोसॉफ्ट`ची विंडो!

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 09:19

भारतीय वंशाचे सत्या नाडेला यांची जगातली सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टच्या `सीईओ`पदी नियुक्ती झालीय.

मोदींच्या उपस्थित सत्यपालसिंह आज `खाकी`तून `खादी`त

Last Updated: Sunday, February 2, 2014, 15:49

मेरठमध्ये आज भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. या सभेतील प्रमुख आकर्षण म्हणजे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह आज मोदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

मुंबई पोलिस आयुक्त डॉ. सत्यपाल यांचा राजीनामा मंजूर

Last Updated: Friday, January 31, 2014, 23:02

डॉ. सत्यपाल सिंह यांचा मुंबई पोलिस आयुक्तपदाचा राजीनामा गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी अखेर स्वीकारला आहे. मुंबई पोलिस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

भारतीय वंशाचे `सत्या` मायक्रोसॉफ्टचं भविष्य?

Last Updated: Friday, January 31, 2014, 18:59

भारतीय वंशाचे सत्या नाडेला कम्प्युटर सॉफ्टवेअर कंपनी `मायक्रोसॉफ्ट`चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सूत्र हाती घेण्याची शक्यता आहे. गेल्या २२ वर्षांपासून नाडेला मायक्रोसॉफ्टमध्ये जोडले गेलेले आहेत.

सत्यपाल सिंहांचा राजीनामा, राजकारणाच्या वाटेवर

Last Updated: Friday, January 31, 2014, 08:03

मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी राजीनामा दिलाय. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवलाय. सत्यपाल सिंह हे लवकरच राजकीय इनिंग सुरू करणार असल्याचीही चर्चा आहे.

अमिरच्या `सत्यमेव जयते`ला सलमान देणार टक्कर

Last Updated: Wednesday, January 8, 2014, 16:15

अभिनेता सलमान खान आणि अमिर खान यांची दोस्ती सर्वांनाच ठाऊक आहे. दोघेही मोठ्या पडद्यावर आपली जादू दाखवत असताना त्यांनी छोट्या पडद्यावर आपला करिष्मा दाखवला आहे. आता सल्लू अमिरला टक्कर देण्याच्या तयारीत आहे. लवकरच सलमानचा सामाजिक विषयावर टीव्ही शो होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सलमान नविन भूमिकेत दिसेल.

आता चित्रपटांत असतील चांगले पोलीस!

Last Updated: Monday, November 11, 2013, 22:58

हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये पोलिसांची छबी चुकीची रंगवली जात असल्याचं मुंबई पोलिसांचं मत बनलंय. ही बाब कलाकार-निर्माता-दिग्दर्शकांच्या कानावर घालण्यासाठी आज अंधेरीत एक बैठक झाली.

आमिर खानचा अमेरिकेत सन्मान

Last Updated: Wednesday, October 30, 2013, 23:37

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला अमेरिकेत सन्मानित करण्यात आलयं.. अमेरिकेचा प्रतिष्ठित इनॉगरल अमेरिका अब्रॉड मीडिया एवॉर्ड आमिरच्या सत्यमेव जयते शोला मिळालाय..

मुंबईच्या वेगाला ट्रॅफिकमुळे लागतोय ब्रेक- अमिताभ बच्चन

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 10:31

मुंबईतल्या ट्रॅफिकमुळे बिग बी अमिताभसुद्धा हैराण आहे. मुंबई कधी थांबत नाही. सतत धावत असते. मात्र याच मुंबईच्या वेगाला ट्रॅफिकमुळे ब्रेक लागतो असं बिग बीनं म्हटलंय.

शकीलच्या धमकीनं चिंतेत नाही - सोनू निगम

Last Updated: Saturday, October 5, 2013, 22:27

छोटा शकीलकडून मिळालेल्या धमकीवरून गायक सोनू निगमनं अखेर आपलं तोंड उघडलंय. परदेश दौऱ्याहून भारतात परतलेल्या सोनूनं झी मीडियाशी खास संवाद साधताना लोकांना ‘मी धमकीवरून अजिबात चिंतेत नाही आणि लोकांनीही माझी काळजी करू नये’ असं आवाहन केलंय.

राष्ट्रपित्याची १४४ वी जयंती...

Last Updated: Wednesday, October 2, 2013, 13:32

आज गांधी जयंती जगाला सत्याग्रहाबरोबरच अहिंसेचे तत्वज्ञान शिकवणा महात्म्याचा आज जन्मदिवस... जगभरात आजचा दिवस अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.

विपश्यनेचे प्रचारक गोयेंका गुरूजींचे निधन

Last Updated: Monday, September 30, 2013, 23:25

विपश्यना साधनेचे प्रचारक सत्यनारायण गोयंका गुरूजी यांचे अंधेरीतील राहत्या घरी रविवारी रात्री निधन झाले. ते ९० वर्षांचे होते.

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी लागणार कुणाची वर्णी?

Last Updated: Wednesday, September 25, 2013, 16:31

डॉ. सत्यपाल सिंग यांच्यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोण विराजमान होणार याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलंय. येत्या ३० सप्टेंबर रोजी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक राज खिलनानी सेवानिवृत्त होत असल्यामुळं गृहखात्याला पोलीस दलात मोठे फेरबदल करावे लागणार आहेत. त्याचवेळी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते यावरही शिक्कामोर्तब केलं जाणार आहे.

'मुंबई गँगरेप प्रकरणातील आरोपींनाही फाशीच हवी'

Last Updated: Saturday, September 14, 2013, 15:08

दिल्ली गँगरेप प्रकरणाशी मिळती जुळती घटना नुकतीच एका फोटो पत्रकाराच्या बाबतीत मुंबईत घडली. दिल्ली गँगरेप प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर मुंबईत फोटो जर्नलिस्टवर झालेल्या गँगरेप प्रकरणातील आरोपींनाही फाशीचच शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी खुद्द पोलीसच कोर्टात करणार आहेत.

...तर पोलीस खातं हवंच कशाला?- उद्धव ठाकरे

Last Updated: Sunday, September 8, 2013, 21:14

गणेश मंडळांवर महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी टाकणार असाल तर पोलीस खातं हवंच कशाला? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी सत्यपाल सिंग यांना विचारलाय.

फिल्म रिव्ह्यू : फसलेला `सत्याग्रह`!

Last Updated: Friday, August 30, 2013, 16:35

राजनैतिक मुद्यांवर सिनेमा बनवण्यासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक प्रकाश झा यांचा बहुचर्चित ‘सत्याग्रह’ अखेर पडद्यावर झळकलाय.

`थ्री के`... करिनाचं नवीन नाव!

Last Updated: Thursday, August 29, 2013, 15:58

करीना कपूर खान... हे आहे ‘बेबो’चं नवीन नाव... करीनाच्या आगामी ‘सत्याग्रह’ या चित्रपटात तिचं नाव असंच दिसेल.

पाचही आरोपी सज्ञान- डॉ. सत्यपाल सिंग

Last Updated: Monday, August 26, 2013, 17:43

महालक्ष्मीच्या शक्ती मिलमध्ये फोटोजर्नलिस्ट तरूणीवर बलात्कार करणारे सर्व आरोपी सज्ञान म्हणजे 18 वर्षांवरील असल्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी स्पष्ट केलंय.

गुन्हा कबूल पण सत्य समोर येईलच- आसाराम बापू

Last Updated: Monday, August 26, 2013, 10:06

अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप असलेले संत आसाराम बापू रविवारी पहिल्यांच सगळ्यांच्या समोर आले. पहासात्मक शैलीत त्यांनी सर्वांसमोर आपल्यावरील आरोप स्विकारले. मात्र लगेचच त्यांनी स्वत:ला निर्दोष असल्याचं म्हणत लवकरच सत्य समोर येईल, असंही म्हटलंय.

मुंबई गँगरेप : एकाला अटक, चार फरार - पोलीस आयुक्त

Last Updated: Friday, August 23, 2013, 15:00

मुंबईतील सामूहिक बलात्काराची घटना अतिशय निंदनीय आहे. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्यांने आपला गुन्हा कबुल केला आहे. तर यातील चार जण फरार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी दिली.

संवेदनशील आमीर...

Last Updated: Wednesday, August 7, 2013, 12:18

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान किती संवेदनशील आहे, हे आपल्याला अनेक उदाहरणांवरुन दिसून आलंय. त्याचाच पुन्हा एकदा प्रत्यय आला. कारण `सत्यमेव जयते` या कार्यक्रमातील आपले अनुभव सांगतांना आमीर इतका हळवा झाला की, त्याला आपल्या अश्रूंनाही आवरता आलं नाही.

पी. सत्यसिवम नवे सरन्यायाधीश

Last Updated: Friday, July 19, 2013, 14:02

भारताचे ४० वे सरन्यायाधीश म्हणून पी. सत्यसिवम यांनी शपथ घेतली. राष्ट्रपतीभवनातल्या दरबार हॉलमध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांना शपथ दिली.

पाहा : बहुचर्चित `सत्याग्रह`ची ही पहिली झलक!

Last Updated: Thursday, June 27, 2013, 15:18

प्रकाश झा यांचा सामाजिक-राजकीय पार्श्वभूमी असलेला बहुचर्चित ‘सत्याग्रह’ या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय.

मोदींची स्तुती जयराम रमेश यांना भोवणार?

Last Updated: Friday, June 14, 2013, 16:24

मोदी हे काँग्रेससाठी आव्हान ठरतील, या जयराम रमेश यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसमध्ये महाभारत सुरू झालंय.

अहमद जावेद होणार नवे मुंबई पोलीस आयुक्त?

Last Updated: Thursday, June 6, 2013, 17:50

अहमद जावेद हे नवे मुंबई पोलीस आयुक्त होण्याची शक्यता आहे. गृहखात्यातल्या सूत्रांनी ‘झी मीडिया’ला दिलेल्या माहितीनुसार अहमद जावेद यांच्या नियुक्तीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही हिरवा कंदील दिलाय.

गुगल डूडलवर दिग्दर्शक सत्यजित रे

Last Updated: Thursday, May 2, 2013, 12:01

जगप्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या जयंती निमित्त गुगलनं त्यांना डूडल-ट्रीब्युट दिलाय. होम पेजवर रे यांच्या प्रसिद्ध सिनेमाचा एक सीन स्केचच्या स्वरुपात चितारण्यात आलाय.

लाचखोर ३६ मुंबई पोलीस निलंबित, आयुक्तांचा अजब दावा

Last Updated: Thursday, April 11, 2013, 12:43

कुर्ला-नेहरूनगरच्या पोलीस लाचखोरी प्रकरणी आयुक्त सत्यपाल सिंग यांनी अजब तर्क लढवलाय. पोलिसांना लाच घेण्यास प्रवृत्त केल्याचं सिंग यांचं म्हणणं आहे. दरम्यान, लाचखोर ३६ मुंबई पोलिसांना निलंबित करण्यात आलंय.

करीना-शाहिद पुन्हा एकत्र?

Last Updated: Monday, February 18, 2013, 20:30

ब्रेक अपनंतर शाहिद कपूर आणि करीना कपूर पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. करीना कपूरचा नवाब सैफ अली खानशी विवाहदेखील झाला आहे. मग आता हे एकत्र कसे येतील?

नाट्य परिषदेच्या निवडणुकीचा वाद पोलीस स्टेशनात!

Last Updated: Friday, February 8, 2013, 11:06

अखिल भारतीय नाट्य परिषदेचा वाद पोलिसात गेलाय. विनय आपटेंनी यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांची भेट घेतलीय. नाट्य परिषद निवडणुकीतील मतपत्रिका घोळा संदर्भात माहिती देण्यासाठी विनय आपटे यांनी ही भेट घेतली.

`म्हणून काय रात्रभर महिलांनी रस्त्यावर फिरायचे?`

Last Updated: Tuesday, December 25, 2012, 17:32

आपल्या देशाला स्वातंत्र्य मध्यरात्री मिळाले. याचा अर्थ घेवून महिलांनी रात्रभर रस्त्यावर भटकायचे काय, असा सवाल केला आहे आंध्रप्रदेशमधील काँग्रेसचे परिवनह मंत्री बोत्सा सत्यनारायण यांनी.

काळ्या पत्रिकेला उत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीची `सत्यपत्रिका`

Last Updated: Thursday, December 13, 2012, 11:07

नागपूर अधिवेशनात विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्याला त्याचपद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात येणार आहे.

मृत हकिमसाठी आमिर म्हणतोय... `सत्यमेव जयते`

Last Updated: Tuesday, November 27, 2012, 12:14

आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात खाप पंचायतीच्या निर्णयांविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अब्दुल हकिम याला २२ सप्टेंबर रोजी आपला प्राणाला मुकावं लागलं होतं. त्यानंतर ‘ऑनर किलिंग’ला बळी पडलेल्या अब्दुलला न्याय मिळवून देण्यासाठी आता आमिर खान पुढं सरसावलाय.

करीना कपूरचा लग्नानंतर `सत्याग्रह`

Last Updated: Monday, November 12, 2012, 08:38

सैफ अली खानशी लगीनगाठ मारल्यानंतर करीना कपूर लग्नानंतर `सत्याग्रह` करणार आहे. हा `सत्याग्रह` सैफविरोधात नाही तर तो तिचा नवीन चित्रपट आहे. या पहिल्या चित्रपटात पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘मैं अण्णा हजारे हूँ’ म्हणणार अमिताभ!

Last Updated: Thursday, October 25, 2012, 23:14

निर्माता-दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या आगामी `सत्याग्रह` या चित्रपटात बीग बी अभिताभ बच्चन आता चक्क ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात बीग बींसोबत अजय देवगण प्रमुख भूमिकेत दिसेल.

पोलिसांवर उचलाल हात, तर लागेल तुमची वाट!

Last Updated: Saturday, October 20, 2012, 09:01

मुंबईमध्ये युनिफॉर्ममधल्या पोलिसांवर हात उचलल्याची जबर किंमत मोजावी लागू शकते. पोलिस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी काढलेल्या एका आदेशानुसार पोलिसांना मारहाण करणाऱ्यावर कठोर कारवाई होणार आहे.

केजरीवाल यांचा 'वीज-पाणी सत्याग्रह...'

Last Updated: Sunday, October 7, 2012, 08:56

‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’नं शनिवारी वीज-पाण्याच्या वाढलेल्या बिलांचा विरोध करत वीज-पाणी सत्याग्रहाला सुरुवात केलीय.

करीना कपूर करणार `सत्याग्रह`?

Last Updated: Tuesday, September 4, 2012, 12:30

राजकीय चित्रपटंबद्दल प्रसिद्ध असलेल्या प्रकाश झा यांच्या आगामी सत्याग्रह या सिनेमाची जुळवाजुळव सुरू झाली आहे. या सिनेमात करीना कपूर राजकारणी स्त्री पुढाऱ्याच्या भूमिकेत दिसू शकते.

टाईम मॅगझीन झालं ‘आमिर`मय!

Last Updated: Friday, August 31, 2012, 15:53

आपल्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांच्या अंतरंगात पोहचण्याचा प्रयत्न करणारा आमिर खाननं आता टाईम मॅगझिनच्या कव्हर पेजवरदेखील स्थान मिळवलंय. टाईम मॅगझीनच्या कव्हर पेजवर जागा मिळवणारा आमिर पहिला भारतीय पुरुष अभिनेता आहे.

पोलिसांचे मनोधैर्य वाढवाः राज ठाकरे

Last Updated: Monday, August 27, 2012, 20:49

पोलिसांचे मनोधैर्य वाढवा, असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांना दिला. मुंबईतील हिंसाचारानंतर पोलिसांना मार खावा लागला होता. तर महिला पोलिसांची छेड काढली गेली होती. याविऱोधात मनसे रस्त्यावर उतरत राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता.

१५ ऑगस्टला पुन्हा `सत्यमेव जयते`

Last Updated: Sunday, August 12, 2012, 20:02

आमिर खानने ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाद्वारे छोट्य पडद्यावर एंट्री केली होती. या कार्यक्रमाला तुफान प्रतिसाद मिळाला. हा कर्यक्रम १५ ऑगस्टला पुन्हा पाहायला मिळणार आहे.

हा आठवडा ठरणार 'सुपरकूल'?

Last Updated: Friday, July 27, 2012, 10:50

या वीकेण्डला कोणकोणत्या फिल्म्स आपल्या भेटीला येतायत याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल ना... मग पाहूया आमचा हा रिपोर्ट...

आमीर खानचा 'सत्यमेव जयते' धडपडला

Last Updated: Monday, July 23, 2012, 19:40

सत्यमेव जयते या कार्यक्रमाच्या टीआरपीबाबत मला अजिबात काळजी नाही, असं म्हणणाऱ्या आमीर खानला मात्र आत टीआरपीची काळजी करावी लागणार आहे.

मैला सफाईबाबत नवं विधेयक - आमिर

Last Updated: Monday, July 16, 2012, 16:55

आमिर खानने सत्यमेव जयते कार्यक्रमातून वाचा फोडलेल्या प्रश्नाबाबत पावसाळी अधिवेशनात विधेयक मांडले जाणार आहे. तशी माहिती सामाजिक न्याय मंत्री मुकुल वासनिक यांनी दिली. पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी गेलेल्या आमिरला वासनिक यांच्याशी चर्चा करण्याचा सल्ला पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिला होता.

आमिर खान पंतप्रधानांच्या भेटीला

Last Updated: Monday, July 16, 2012, 10:09

प्रसिद्ध अभिनेता आमिर खान आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेणार आहे. आमिर यावेळी डोक्यावर मैला वाहून नेणाऱ्यांच्या समस्येवर चर्चा करणार आहे. आरोग्याचा हा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी आमिरची मागणी आहे.

आमिर खान भावी पंतप्रधान - शक्ती कपूर

Last Updated: Thursday, July 12, 2012, 13:59

शक्ती कपूरची स्वतःची प्रतिमा जनमानसात कशीही असली आणि त्याचं वागणं कितीही वादग्रस्त असलं, तरी शक्ती कपूरने आपल्याला देशाची काळजी असल्याचं दाखवायला सुरूवात केली आहे.

'थोडी सी शराब'... आमीर सापडला वादात

Last Updated: Thursday, July 12, 2012, 11:30

आमीर खान प्रोडक्शननिर्मित सत्यमेव जयते हा पुन्हा एकदा वादात सापडलाय. ‘ज्यांना दारु प्यायची असेल त्यांनी थोडी थोडी प्या’ हे आमीरचं वक्तव्यं आता चर्चेचा विषय ठरलंय.

जावेद अख्तर होते पक्के दारुडे

Last Updated: Sunday, July 1, 2012, 18:57

मी १९ व्या वर्षापासूनच म्हणजे मी ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षापासून दारु प्यायला लागलो होतो. हळू -हळू ही सवय इतकी होत गेली की मी रोज एक बाटलीची दारु संपवू लागलो होतो, असे स्वतः बॉलीवूडमधील प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी कबुली दिली. तब्बल २६-२७ वर्षापर्यंत पक्का दारुडा होतो, असेही त्यांनी आमिर खानच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमात मान्य केले.

आमीर म्हणतो, 'टीआरपी'ची चिंता कोणाला?

Last Updated: Wednesday, June 27, 2012, 18:08

काही लोक आमीर खानच्या टीव्ही शो 'सत्यमेव जयते' याबाबत नाराज आहे. हा शो यावर्षी सहा मे पासून झाला. आमीर खानच्या भन्नाट विचारसरणीवर बेतलेल्या या शोसाठी अनेकजण टीव्हीकडे डोळे लावून बसलेले असतात.

आगीचं सत्य आता सगळं बाहेर येणार...

Last Updated: Friday, June 22, 2012, 19:31

मंत्रालयात लागलेल्या आगीची क्राईम ब्रांचनी चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी क्राईम ब्रांचची टीम चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर तपास करत आहेत. मात्र सहाव्या आणि सातव्या मजल्यावर उष्णता जास्त असल्यामुळे फायर ब्रिगेड कुलिंग ऑपरेशन करत आहेत.

स्त्रीभ्रूण हत्या: आमिर जाणार राज्यसभेत

Last Updated: Wednesday, June 20, 2012, 15:02

आमिर खान प्रोडक्शननिर्मित ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी अभिनेता आमिर खाननं स्त्री भ्रूण हत्येच्या गंभीर विषय मोठ्या सामंजस्यानं हाताळला होता. हाच विषय राज्यसभेत मांडण्यासाठी आमिरला आमंत्रण देण्यात आलंय आणि आमिरनं ते स्विकारलंही आहे.

'सलमान'ला आमीरचा 'अभिमान', काय म्हणतो 'खान'

Last Updated: Tuesday, June 19, 2012, 13:33

अभिनेता सलमान आणि आमिर खान यांचं नातं इतकं चागलं नाहीये. आजवर त्या दोघांनी फक्त एकच सिनेमामध्ये काम केलं आहे. दोघं एकमेकांबाबत बोलण्यासही का - कू करीत असतात.

सलमान आमिरला म्हणाला 'टिलू'

Last Updated: Sunday, June 17, 2012, 17:43

बॉलिवूडमध्ये सलमान खान आणि आमिर खानची मैत्री म्हणजे ‘जय-वीरू’च्या मैत्रीसारखी प्रसिद्ध आहे. खरंतर सलमान खान आणि आमिर खानने फक्त एकाच सिनेमात एकत्र काम केलं आहे. मात्र, तेव्हापासून निर्माण झेली मैत्री आजही तितकीच घनिष्ट आहे.

आमिरमुळे चिमुरडी पळून लग्न करणार!

Last Updated: Wednesday, June 13, 2012, 18:18

बॉलिवुड स्टार आमिर खानचा शो सत्यमेव जयते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या शोमध्ये उपस्थित केलेल्या मुद्द्यामुळे आमिर खान रोज एका नव्या अडचणीत सापडत आहे. सुरूवातीला डॉक्टरांनी आमिरला माफी मागण्यास सांगितले होते. आता हरिणाची खाप पंचायत त्याच्यामागे पडली आहे.

खाप पंचायतीची ‘पंचाईत’?

Last Updated: Saturday, June 9, 2012, 17:57

दोन आठवड्यांपूर्वी डॉक्टरांच्या काळ्या बाजूचं दर्शन घडवून आमिरला डॉक्टरांचा रोष आमिरनं ओढावून घेतला होता. तर मागच्या आठवड्यात खाप पंचायतीलाच ‘पंचायती’समोर बसवून आमिर पुन्हा रोषाचा धनी झालाय.

खटला दाखल केला तरी पर्वा नाही- आमिर

Last Updated: Thursday, June 7, 2012, 18:39

सत्यमेव जयते या कार्यक्रमातून जनजागृती करणारा बॉलिवुडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमीर खानने डॉक्टरांची माफी मागण्यास इन्कार दिला आहे. त्यामुळे आता भारतीय वैद्यकीय संस्थेने माझ्याविरोधात खटला दाखल केला, तर त्यास मी तयार असल्याचे आमीरने म्हटले आहे.

डॉक्टरांची माफी मागणार नाही – आमिर खान

Last Updated: Thursday, June 7, 2012, 18:40

सत्यमेव जयते या कार्यक्रमातून जनजागृती करणारा बॉलिवुडचा मिस्टर पर्फेक्शनिस्ट आमीर खानने डॉक्टरांची माफी मागण्यास इन्कार केला आहे. शोमधून डॉक्टरांची तसेच त्याच्या पेशाची बदनामी केली असल्याचा आरोप करत डॉक्टरांनी आमिरकडे माफीची मागणी केली होती.

आमिर खान करणार विनामोबदला जनजागृती

Last Updated: Wednesday, June 6, 2012, 07:42

टीव्ही पडद्यावर आपल्या सत्यमेव जयते या शोद्वारे सामाजिक मुद्द्यांना ऐरणीवर आणणारा अभिनेता आमिर खान आता लवकरच एका प्रचार अभियानाद्वारे कुपोषणच्या समस्येवर जनतेला जागरुक करायला निघणार आहे.

आमिरच्या औषधांनी डॉक्टरांचं तोंड कडू

Last Updated: Thursday, May 31, 2012, 23:50

'सत्यमेव जयते'द्वारे आमिर खान पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. त्याचं केवळ अभिनयापुरतंच मर्यादित न राहाता सामान्य जनतेचे प्रश्न कळकळीने मांडणं लोकांना पसंत पडल्याचं दिसत आहे. मात्र, काही लोक मात्र आमिरच्या या कार्यक्रमाबद्दल नाराज झाले आहेत.

'स्त्री भ्रूण हत्ये'च्या प्रश्नावर आमिर रस्त्यावर?

Last Updated: Wednesday, May 30, 2012, 11:14

मुलींचं घटत जाणारं प्रमाण लक्षात घेऊन बिहार सरकारनं ‘बिटीया बचाओ आंदोलन’ सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. आणि यासाठी त्यांना मदत हवीय अभिनेता आमीर खानची...

'...तर आमिरचं काय चुकलं?'

Last Updated: Tuesday, May 15, 2012, 16:54

‘आमिरनं त्याची सामाजिक मुद्दे उचलून धरण्यासाठी वापरली तर त्यात वाईट काय आहे’, असा प्रश्न टीकाकारांना विचारत चित्रपट निर्माता शेखर कपूरनं आमिरची पाठराखण केलीय.

संवेदनशील मुद्द्यातून आमिर कमवतो पैसा!

Last Updated: Monday, May 14, 2012, 18:11

आमिर खानने 'सत्‍यमेव जयते' या शो मधून स्‍त्री भ्रृणहत्‍या सारखा संवेदनशील विषय हाताळून राजस्‍थानची बदनामी केली असून असे भावनिक मुद्द्यांना मनोरंजनाचे साधन बनविल्याची जळजळीत टीका राजस्थानचे आरोग्‍य राज्‍यमंत्री डॉ.राजकुमार शर्मा यांनी केली आहे.

आमिर, तुझा अभिमान वाटतो- दिलीप कुमार

Last Updated: Thursday, May 10, 2012, 16:30

हिंदी सिनेमासृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांनी आमिर खान आणि त्याच्या सत्यमेव जयते या टीव्ही कार्यक्रमाचं कौतुक केलं आहे.

आमिर खान गहलोत यांच्या भेटीला

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 18:21

टी व्ही शो 'सत्यमेव जयते' च्या माध्यमातून कन्या भ्रूण हत्येवर लगाम घालण्याचा उपक्रम सुरू करणारा फिल्म स्टार आमिर खान राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची भेट घेण्यासाठी जयपूर येथे दाखल झाला आहे.

राखी सावंत म्हणते, आमिर खान चोरटा

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 18:19

‘सत्यमेव जयते’ हा कार्यक्रम जेव्हापासून सुरू झालाय, तेव्हापासूनच तो वेगवेगळ्या कारणांसाठी सतत चर्चेत राहिलाय. आता या चर्चेमध्ये राखी सावंतही सहभागी होतेय. आयटम गर्ल राखीच्या म्हणण्यानुसार ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाची संकल्पना ही तिची आहे आणि आमीर खाननं ही संकल्पना चोरली आहे.

ठाकरेंनी केले आमिरचे कौतुक, कर्नाटकावर तोंडसुख!

Last Updated: Tuesday, May 8, 2012, 20:33

आमिर खानच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमाच्या प्रसारणावर बंदी घालून कर्नाटक सरकारने काय मिळवले, असा सवाल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केला आहे. निदान ‘सत्यमेव जयते’ या ब्रीदवाक्याचा तरी सन्मान ठेवायचा, पण प्रांतीयतेपुढे कसले आलेय सत्यमेव जयते!

आमिरच्या प्रसिद्धीने तसलिमा नसरीनचा जळफळाट

Last Updated: Tuesday, May 8, 2012, 17:36

स्त्रीवादी आणि सामाजिक कार्यकर्त्या तसलिमा नसरीन यांना आमीर खानच्या 'सत्यमेव जयते'मुळे प्रचंड धक्का बसला आहे. आमीर खानने मांडलेल्या समाजातील मुद्यांवर प्रेक्षकांनी ज्या प्रमाणावर प्रतिसाद दिला, तो पाहून तसलिमा नसरीन हैराण झाल्या आहेत.

आमिर खानचा 'सत्यमेव जयते' वादात

Last Updated: Tuesday, May 8, 2012, 10:18

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा पहिला टीव्ही शो ‘सत्यमेव जयते’चा पहिला भाग रविवारी प्रसारित झाला आणि हा शो हिट झाल्याच्या प्रतिक्रिया सोशल नेटवर पाहायला मिळाल्या. मात्र, या आनंदाच्या बातम्यावर विरजण टाकण्याचे दुसरी बातमी आली आणि हा शोच आता वादात सापडला आहे.

मनाला भिडणारा अमिरचा ‘सत्यमेव जयते’

Last Updated: Monday, May 7, 2012, 17:31

अमिर खानचा पहिला टीव्ही शो ‘सत्यमेव जयते’चा पहिला भाग गेल्या रविवारी प्रसारित झाला आणि या पहिल्याच शोने ट्विटरसह लोकांच्या मनाला साद घातली आहे. शो संपण्यापूर्वीच या शो संदर्भात ट्विटरवर जबरदस्त ट्विटिवाट ऐकायला मिळाला.

सलमानसाठी पैशापेक्षा आमीर महत्त्वाचा

Last Updated: Monday, April 23, 2012, 21:49

सलमान खान आणि आमीर खान यांनी खरंतर एकत्र काम केलंय, ते फक्त एकाच सिनेमात. 'अंदाज अपना अपना' येऊनही बरीच वर्षं झाली. पण, तरीही त्यांची एकमेकांशी मैत्री अजूनही तितकीच घट्ट आहे.

चवदार तळे सत्याग्रह ८५ वर्ष पूर्ण

Last Updated: Tuesday, March 20, 2012, 08:06

महाडचे चवदार तळे अजरामर झाले ते डॉ. बाबासाहेब यांनी केलेल्या सत्याग्रहामुळे. महाडच्या चवदार तळ्याच्या ऐतिहासिक सत्याग्रहाला आज ८५ वर्षे पूर्ण होत आहेत.

पाच महापालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

Last Updated: Tuesday, March 13, 2012, 16:18

पाच महानगरपालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम आज राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायणन यांनी जाहीर केला आहे. भिवंडी, परभणी, लातूर, मालेगाव आणि चंद्रपूर या महापालिकांसाठी पंधरा एप्रिलला मतदान होणार आहे.

राज ठाकरेंच्या वक्तव्यावर निवडणूक आयुक्तांची नाराजी

Last Updated: Thursday, January 19, 2012, 18:26

निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे, त्यामुळे आयोगाचा अपमान म्हणजे राज्याचा अपमान आहे, असं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर राज्याच्या निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी नाराजी व्यक्त केली.

पुतण्यांकडून 'खुलासा', काकांना 'ग्रीन सिग्नल'

Last Updated: Friday, January 13, 2012, 17:10

शरद पवार यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचा आणखी एक नमुना समोर आला आहे. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कारवाईची शक्यता असतानाच केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्याला निवडणूक आयोगानं ग्रीन सिग्नल दिला आहे.

ज्येष्ठ रंगकर्मी पंडित सत्यदेव दुबे यांचं निधन

Last Updated: Sunday, December 25, 2011, 14:54

ज्येष्ठ रंगकर्मी पंडित सत्यदेव दुबे यांचं आज निधन झालं. त्यांचा मुंबईतल्या राहत्या घरी सत्यदेव दुबे याचं निधन झालं, १९३६ मध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी मराठी रंगभूमीसाठी भरीव कामगिरी केली होती.

अण्णा ‘टाइम’ तुमचा आहे

Last Updated: Thursday, December 8, 2011, 10:17

पं. राम मराठे संगीत समारोह

Last Updated: Friday, November 18, 2011, 16:25

नंदिनी बेडेकर यांचे सुश्राव्य गायन, सत्यजित तळवलकर यांचे तबलावादन आणि कथ्थक नृत्यांगना आदिती भागवत यांचा नृत्याविष्कार चढविलेला कळस यामुळे संगीतभूषण पं. राम मराठे संगीत स्मृती समारोहाचा पहिला दिवस गाजला.