'काका'च्या संपत्तीतून डिंपल बेदखल - Marathi News 24taas.com

'काका'च्या संपत्तीतून डिंपल बेदखल

www.24taas.com, मुंबई  
बॉलिवूडचा एकमेव ‘सुपरस्टार’ अशी उपाधी मिळवलेल्या राजेश खन्ना यांनी १८ जुलै रोजी या जगाचा निरोप घेतलाय. त्यांच्या मृत्यूनंतर अनिता अडवाणी हीनं राजेश खन्ना यांच्या ‘आशिर्वाद’ बंगल्यावर हक्क दाखवला आणि काकांच्या मृत्यूनंतर संपत्तीवाद चव्हाट्यावर आला. आता या वादात आणि भर पडलीय. कारण, राजेश खन्ना यांनी बनवलेल्या मृत्यूपत्रात त्यांची पूर्व पत्नी डिंपल कपाडिया हिला संपत्तीतून बेदखल केलंय.
 
एकेकाळचा सुपरस्टार राजेश खन्ना जाताना जवळजवळ २०० कोटी रूपयांची संपती मागे सोडून गेलाय. या संपत्तीवर आता कोणाचा हक्क आहे याबद्दल सर्वांनाच उत्सूकता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राजेश खन्ना यांनी त्यांच्या संपत्तीतून पत्नी डिंपलला काहीही दिलं नाही. मृत्यूची चाहूल लागताच राजेश खन्ना यांनी मृत्यूपत्र तयार करून घेतलं होतं. यात त्यांनी आपल्या सगळ्या संपत्तीचा हक्क आपल्या दोन्ही मुलींना म्हणजेच ट्विंकल आणि रिंकी यांना दिलाय. मृत्यूपत्रात त्यांनी आपल्या संपत्तीबरोबर बँक खात्यांची माहितीही दिलीय. पण, डिंपलच्या नावावर कोणत्याही संपत्तीचा उल्लेख करणं मात्र काकांनी या मृत्यूपत्रात टाळलंय.
 
हे मृत्यूपत्र राजेश खन्ना, पत्नी डिंपल, जावई अक्षय कुमार, राजेश खन्ना यांचे काही जवळचे मित्र आणि फॅमिली डॉक्टर दिलीप वालवकर यांच्यासमोर वाचण्यात आलं. या मृत्यूपत्र वाचनाचा व्हिडिओदेखील तयार करण्यात आलाय. महत्त्वाचं म्हणजे याच डिंपलचा हात हातात घेऊन काकांनी शेवटचा श्वास घेतला.
 
 
.

First Published: Sunday, July 29, 2012, 13:36


comments powered by Disqus