मिनीषा लांबा हिला ४ लाखांचा दंड - Marathi News 24taas.com

मिनीषा लांबा हिला ४ लाखांचा दंड

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
अभिनेत्री मिनीषा लांबा हिला ४ लाखांचा दंड भरावा लागणार आहे. १८ मेला कान्स फिल्म फेस्टीव्हलहून परततांना जवळपास ३३ लाखांचे दागिने आणि काही अमुल्य वस्तू कस्टम ड्यूटी न भरता ग्रीन चॅनेलमधून नेल्याप्रकरणी तिला हा दंड भरावा लागणार आहे.
 
त्याचसोबत ब्रँडेड बॅग्ज,शुज आणि सनग्लालेस साठीही तिला अतिरीक्त १० हजार भरावे लागणार आहेत.ब्रॅडेड वस्तू बाहेरुन आणतांना त्यावर कस्टम ड्यूटी भरावी लागते मात्र याविषयी माहिती नसल्याचं स्पष्टीकरण मिनीषाने दिलंय.
 
अनमोल ज्वेलरीचे खरेदीविषयीचे डिटेल्स असलेलं पत्र आपल्याकडून हरवल्याचं मिनीषाच्या वकीलाने सांगितलं होतं. त्य़ानंतर कस्टम विभागाने मिनिषाला ४ लाखांचा दंड ठोठावलाय.
 
 

First Published: Saturday, December 17, 2011, 11:43


comments powered by Disqus